लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:37+5:302021-03-19T04:12:37+5:30
चांदूर बाजार-जसापूर रस्ता प्रकरण चांदुर बाजार : तालुक्यातील जसापूर ते चांदुर बाजार या अतिशय खराब झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती ...

लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
चांदूर बाजार-जसापूर रस्ता प्रकरण
चांदुर बाजार : तालुक्यातील जसापूर ते चांदुर बाजार या अतिशय खराब झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व बांधकाम करण्याच्या मागणीसाठी प्रदीप बंड यांच्याकडून बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाला जसापूर येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला होता. सदर उपोषणाची दखल घेऊन लेखी आश्वासनानंतर प्रदीप बंड आणि गावकऱ्यांचे उपोषण १७ मार्च रोजी मागे घेण्यात आले.
उपोषण सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता नितीन झगडे, पंचायत समिती माजी सभापती राजेश वाटाणे, पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले आणि नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांनी १६ मार्च रोजी सायंकाळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची मागणी समजून घेतली. शिरजगाव कसबा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार, पंचायत समिती सदस्य सुनीता झिगरे यांनीदेखील उपोषण मंडपाला भेट दिली.
----