शंखीचा प्रादुर्भाव, पिकांचे नुकसान, प्रहार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:01:21+5:30

शंखीचा प्रादुर्भाव वाढल्याने कपाशी, संत्री, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असताना कोसळलेल्या या संकटासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन केले नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिसेवा केंद्रांमध्ये औषधी उपलब्ध नाही. याबाबत प्रहार पक्षाने कृषी उपसंचालकांच्या टेबलवर शंखी टाकून रोष व्यक्त केला.

Conch infestation, crop damage, strike aggression | शंखीचा प्रादुर्भाव, पिकांचे नुकसान, प्रहार आक्रमक

शंखीचा प्रादुर्भाव, पिकांचे नुकसान, प्रहार आक्रमक

ठळक मुद्देविमा पोर्टलवरील दोष निवारण करा : युवक काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यासह जिल्ह्यात शंखी (गोगलगाय) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कीटकनाशक कृषिसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे बुधवारी कृषी उपसंचालकांकडे करण्यात आली.
शंखीचा प्रादुर्भाव वाढल्याने कपाशी, संत्री, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असताना कोसळलेल्या या संकटासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन केले नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिसेवा केंद्रांमध्ये औषधी उपलब्ध नाही. याबाबत प्रहार पक्षाने कृषी उपसंचालकांच्या टेबलवर शंखी टाकून रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख मंगेश देशमुख, राजकुमार शेळके, अमोल शेळके, सुनील मोहोड, आदित्य ठोकळ, बाबूराव राऊत, सचिन शेळके, भय्या राऊत आदी उपस्थित होते.

विमा पोर्टलवरील दोष निवारण करा : युवक काँग्रेस
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पोर्टलवर असलेले तांत्रिक दोष निवारण करून योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांद्वारे बुधवारी करण्यात आली. याविषयी निवेदन कृषी उपसंचालकांना देण्यात आले. या योजनेच्या पोर्टलवर सात-बारा प्रमाणित होत नाही. त्यामुळे शेतकरी विमा हप्ता भरण्यापासून वंचित होत आहेत. पोर्टलवर गावे न दिसणे, गैरकर्जदार शेतकऱ्यांचे बँकांद्वारे अर्ज न स्वीकारणे आदी अडचणी येत आहेत. त्यामुळे या योजनेतील गावांच्या नावांची दुरुस्ती पोर्टलवर करण्यात यावी व अधिकाधिक शेतकºयांचा समावेश या योजनेमध्ये समावेश होण्यासाठी ३१ जुलै रोजीच्या मुदतीला वाढ देण्यात यावी, अशी मागणी युवक काँगे्रसच्यावतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कलाने यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Conch infestation, crop damage, strike aggression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती