संत्र्यासह फळपिकांवर शंखीचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:27+5:30

शंखी तसेच शेंबडी हे प्राणी या विभागात समाविष्ट केलेले आहेत. शंखीच्या पाठीवर १ ते १ १/१ इंच (२ ते ४ सेंमी) लांबीचे गोलाकार कवच असत. बहुतांशी शंखी गर्द, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. शंखी गोगलगाय ‘आफ्रिकन जॉइन्ट स्नेल’ नावाने परिचित आहे व तिचे शास्त्रीय नाव ‘अचेटिना फुलिका’ आहे. ती निरनिराळ्या ५०० वनस्पती खाऊन जगते.

Conch attack on fruit crops including oranges | संत्र्यासह फळपिकांवर शंखीचा अटॅक

संत्र्यासह फळपिकांवर शंखीचा अटॅक

ठळक मुद्देएकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे; कडधान्य पिकांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वच तालुक्यातील संत्रासह फळपीक तसेच खरीप पिकावर गोगलगाईचा प्रादुर्भाव झालेला आहे. शंखी (गोगलगाय) पाने खाताना दिसून येत आहे. या अकीटकीय किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सध्या बहुविध पिकांवर प्रादुर्भाव झाल्याने उद्रेकीय बहुभक्षी कीड म्हणून बहुतांशी पिकांना धोका पोहचण्याची शक्यता पाहता एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
शंखी तसेच शेंबडी हे प्राणी या विभागात समाविष्ट केलेले आहेत. शंखीच्या पाठीवर १ ते १ १/१ इंच (२ ते ४ सेंमी) लांबीचे गोलाकार कवच असत. बहुतांशी शंखी गर्द, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. शंखी गोगलगाय ‘आफ्रिकन जॉइन्ट स्नेल’ नावाने परिचित आहे व तिचे शास्त्रीय नाव ‘अचेटिना फुलिका’ आहे. ती निरनिराळ्या ५०० वनस्पती खाऊन जगते. शेतातून मोठ्या शंखी जमा करून प्लास्टिक थैलीत भरून त्यात चुन्याची फंकी किंवा कोरडे मीठ टाकून पोते शिवून धुऱ्याकाठी ठेवावेत. त्यामुळे त्या आतल्या आत मरून जातात. ड्युनेट विषारी आमिषा तयार करून त्याचे गोळे बनवून शेताच्या कडेकडेने टाकल्यास शंखी नष्ट होते. एका ड्रममध्ये १०० लिटर पाणी घेऊन त्यात ५०० ग्रॅम गूळ १२.५ ग्रॅम यीस्ट १२.५ ग्रॅम मिथोमिल ४० टक्के पावडर मिसळून कीटकनाशक द्रावण तयार करावे. नंतर त्यामध्ये २५ किलो गव्हाचा कोंडा किंवा पशुखाद्य द्रावणात बुडवून ते गोळे शेताच्या कडेकडेने सायंकाळी टाकावे, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ अनिल ठाकरे यांनी दिली.

असे करावे व्यवस्थापन
गोगलगाईच्या लपण्याच्या जागा शोधून त्या स्वच्छ व सपाट करावी, सांयकाळी व सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात व जमिनीत खड्डा करून त्यात पुराव्यात किंवा केरोसीनमिश्रित पाण्यात बुडवून माराव्या, गोगलगाईची अंडी गोळा करून नष्ट करावीत, गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावीत, त्यावर शंखी आकर्षित होऊन सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली जमा करून नष्ट कराव्यात. चुन्याच्या भुकटीचा चार इंचाचा पट्टा बांधाच्या शेजारी टाकावा.

अशी करा उपाययोजना
जमीन ओली असल्यास किंवा पाऊस असल्यास भाताचे किंवा गवताच्या कांडाचे तुकडे, गूळ व ईस्ट आणि मिथोमिल यांच्या मिश्रणात भिजवून बांधाच्या शेजारी चार इंच पट्टा पद्धतीने टाकावे. पाच टक्के मेटाल्डीहाईड आधिक गव्हाचा कोंडा, गूळ, पाण्याचे आमिषा शेतात ठिकठिकाणी पानावर ठेवल्यास शंंखी खाऊन मरतात, मेटाडेक्स पाच टक्के पावडरची रोपांवर/झाडांवर धुरळणी केल्याने शंखीचे नियंत्रण होते. छोटया आकाराच्या शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठीबरेच ठिकाणी वापर करता येतो.

Web Title: Conch attack on fruit crops including oranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती