सहभागी लोकशाहीची संकल्पना सनदी सेवेतून शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:10 IST2016-02-02T00:10:24+5:302016-02-02T00:10:24+5:30
स्पर्धेत टिकायचे असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नसून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवावे ...

सहभागी लोकशाहीची संकल्पना सनदी सेवेतून शक्य
पालकमंत्री पोटे : महाबोधी फाऊंडेशनचा कार्यक्रम
अमरावती : स्पर्धेत टिकायचे असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नसून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवावे व डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित सहभागी लोकशाहीची संकल्पना सनदी सेवेतून पूर्ण करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
महाबोधी फाउंडेशनच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी, सातत्य ,परिश्रम व संयम आवश्यक असून महाराष्ट्राला आपल्या मायभूमितील सनदी अधिकाऱ्यांची फार आवश्कता आहे. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मंचावर बबन बेलसरे, उपविभागीय अधीकारी प्रवीण ठाकरे, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, संजय अग्रवाल, तहसीलदार वाहुरवाघ, कमलाकर पायस, प्रवीण मनोहरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)