मोर्शी येथे संगणक परिचालकांचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:24+5:302021-02-05T05:24:24+5:30
रिद्धपूर (मोर्शी) : सर्व संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करून ...

मोर्शी येथे संगणक परिचालकांचे निषेध आंदोलन
रिद्धपूर (मोर्शी) : सर्व संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सोमवारी तालुक्यातील संगणक परिचालकांनी येथील पंचायत समितीसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
निवेदनानुसार, शासनाने १४ जानेवारी रोजी संगणक परिचालकांवर अन्यायकारक असलेले दोन शासननिर्णय निर्गमित केले. एका शासननिर्णयानुसार संगणक परिचालकांना पूर्वी असलेल्या सहा हजार रुपये मानधनात फक्त एक हजार रुपयांची वाढ करून संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले. त्यामुळे या संगणक परिचालकांमध्ये मोठा असंतोष आहे. त्या दोन्ही शासननिर्णयांचा निषेध करण्यासाठी सोमवारी मोर्शी पंचायत समिती कार्यालयासमोर संगणक परिचालकांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. त्या शासननिर्णयांची होळी केली. यात जिल्हा उपाध्यक्ष कैलास भिवगडे, तालुकाध्यक्ष नीलेश नन्नावरे, तालुका सचिव प्रवीण वाघाडे व इतर परिचालक उपस्थित होते.
---------