अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गाचे मोजमाप पूर्ण

By Admin | Updated: December 11, 2015 00:45 IST2015-12-11T00:45:00+5:302015-12-11T00:45:00+5:30

शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचे गुरुवारी सामाजिक बांधकाम विभागाकडून ८० फुटांपर्यंतचे मोजमाप करण्यात आले आहे.

Complete the measurement of the main road of Amravati-Burhanpur | अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गाचे मोजमाप पूर्ण

अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गाचे मोजमाप पूर्ण

अन्यथा गजराज चालणार : १४ डिसेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची ताकीद
श्यामकांत पाण्डेय धारणी
शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचे गुरुवारी सामाजिक बांधकाम विभागाकडून ८० फुटांपर्यंतचे मोजमाप करण्यात आले आहे. १४ डिसेंबरपर्यंत अतिक्रमितांना स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी डेडलाईन देण्यात आले असून १४ डिसेंबरलनंतर गजराज चालणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी दिली आहे.
गुरुवारी सकाळपासून एपीएमसी नाक्यापासून एस्सार पेट्रोलपंपपर्यंत एबी रोडचे रस्त्याच्या मध्यपासून दोन्ही बाजूवरील ४०-४० फुटापर्यंत मोजणी करून मार्किंंग करण्यात आले. यावेळी सा. बां. चे अभियंते अभय बारब्दे व मंगेश खरळ यांनी पंचनामे तयार केले. आज जवळपास १०० च्यावर अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणकाऱ्यांना १४ डिसेंबरपर्यंत डेडलाईन जारी करण्यात येणार आहे.
नवनियुक्त नगरपंचायतच्या पहिल्याच बैठकीत अतिक्रमण ३६ फुटापर्यंतच काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत सामाजिक बांधकाम विभागकार्यकारी अभियंता भावे यांनी तत्काळ ८० फुटांपर्यंत मोजमाप करण्याचे निर्देश उपअभियंता पाटणकर यांना दिले होते. त्यानुसार आजची मोजमाप कार्यवाही सुरू असताना लोकांमध्ये उत्सुकता वजा भयाचे वातावरण पाहावयास मिळाले.

Web Title: Complete the measurement of the main road of Amravati-Burhanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.