भक्तांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
By Admin | Updated: August 30, 2016 00:05 IST2016-08-30T00:05:48+5:302016-08-30T00:05:48+5:30
बुधवारी अज्ञात व्यक्तीने येथील खापर्डेवाड्यातील श्री संत गजानन महाराजांची प्रतिमा येथील चौथऱ्यावरून हटविण्याचा प्रताप केला होता.

भक्तांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
कारवाईची मागणी : गजानन महाराजांच्या प्रतिमेची विटंबना
अमरावती : बुधवारी अज्ञात व्यक्तीने येथील खापर्डेवाड्यातील श्री संत गजानन महाराजांची प्रतिमा येथील चौथऱ्यावरून हटविण्याचा प्रताप केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
दर गुरुवारी श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे येथे असंख्य भाविक पूजा - अर्चना करीत होते. पण या जागेच्या मालकाने तेथील संत गजानन महाराजांचे फोटो फेकून विटंबना केल्याचा आरोप भाविकांनी निवेदनात केला आहे. यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमिवर दुखावल्या सदर व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रमोद तिखिले, राजू जुनघरे, केशव वानखडे, अशोक नेमाडे निखिल शर्मा, अजय विश्वकर्मा, राजू परिहार, आनंद धवणे, योगेश ताकपिरे, नितीन गौड, उमेश पडोळे, नंदु मारोडकर, अजय सारसकर, सुयोग भुतडा, गणेश काकडे, सत्यनारायण यादव, शरद गासे प्रकाश गावंडे, आकाश पाटील उमेश घोंगडे आदी उपस्थिीत होते.
पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
सदर प्रकरण पोलीस आयुक्तांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. संत गजानन महाराजांची प्रतिमा काढल्यानंतर भाविकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठून त्यांनी सीपींची भेट घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण सदर जागेच्या मालकाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.