पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार

By Admin | Updated: August 26, 2014 23:04 IST2014-08-26T23:04:27+5:302014-08-26T23:04:27+5:30

विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थांचा शाळेत बोगस प्रवेश केल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे प्राप्त झाली.

Complaint to the Police Commissioner | पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार

पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार

शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती : विकास विद्यालयातील बनावट पटसंख्येचे प्रकरण
अमरावती : विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थांचा शाळेत बोगस प्रवेश केल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे प्राप्त झाली. परंतु याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई न झाल्याने ‘लोकमत’ने मंगळवारी ‘उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीला पोलिसांचा खो’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने पोलीस व शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली नसल्याचे पाहून शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड हे बुधवारी थेट पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे याप्रकरणाची तक्रार करणार आहेत.
विकास विद्यालयातील घोटाळा चौकशीदरम्यान स्पष्ट झाल्याने शिक्षणाधिकारी राठोड यांनी याप्रकरणी गैरअर्जदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांना दिले होते. राजगुरे यांनी १३ मार्च २०१४ रोजी याप्रकरणी २६४ पानांची लेखी तक्रार पुराव्यासह गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. परंतु याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्याने पाणी मुरत असल्याचा आरोप उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी केला. याप्रकरणाची माहिती ‘लोकमत’ला प्राप्त होताच मंगळवारी विकास विद्यालयासंदर्भातील घबाड उघड करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले. हे वृत्त प्रकाशीत होताच शिक्षण व पोलीस विभाग खडबडून जागे झाले. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीची गाडगेनगर पोलिसांनी दखल न घेतल्याने स्वत: शिक्षणाधिकारी राठोड हे पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत. याप्रकरणी पोलीस आयुक्त सुरेश मेकला काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Complaint to the Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.