‘ईव्हीएम’ घोटाळ्याची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

By Admin | Updated: March 2, 2017 00:11 IST2017-03-02T00:11:50+5:302017-03-02T00:11:50+5:30

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ईलेक्ट्रॉनिक्स व्होटर मशीन (ईव्हीएम) मध्ये घोटाळा झाल्याबाबतची तक्रार आ. रवी राणा यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त ज.ह. सहारिया यांच्याकडे दिली आहे.

Complaint to Election Commissioner of the EVM scam | ‘ईव्हीएम’ घोटाळ्याची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

‘ईव्हीएम’ घोटाळ्याची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

चौकशी करा : विशिष्ट उमेदवार विजयी
अमरावती : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ईलेक्ट्रॉनिक्स व्होटर मशीन (ईव्हीएम) मध्ये घोटाळा झाल्याबाबतची तक्रार आ. रवी राणा यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त ज.ह. सहारिया यांच्याकडे दिली आहे. ईव्हीएममध्ये सॉफ्टवेअर चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
२१ फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणूक पार पडली. २३ फेब्रुवारीला मतमोजणी झाली. मात्र ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाल्याने युवा स्वाभीमान पार्टीच्या उमेदवारांना मते मिळाली नसल्याचे मतमोजणीअंती स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यामुळे जनमत नसलेल्या उमेदवारांना तसेच त्या ठिकाणी मतदान नसलेल्या उमेदवारांना मते मिळाल्याचे दिसून येते. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या होय, असा आरोप आ. राणांनी केला.
काही प्रभागात तर उमेदवार असलेल्या नातेवाईकांचे मतदान गायब झाले आहे. विशिष्ट उमेदवारांना मते दिल्याचे ठोसपणे सांगत असताना ‘ईव्हीएम’ घोटाळ्याने भलतेच उमेदवार निवडून आले आहेत. ‘ईव्हीएम’मध्ये वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर सदोष नाही. त्यामुळे विशिष्ट उमेदवार विजयी झाले आहेत. ‘ईव्हीएम’मध्ये झालेला घोळ व प्रक्रियेत भष्ट्राचार शोधून काढण्यासाठी सर्वंकष चौकशी करुन लोकशाहीला न्याय प्रदान करावा, अशी मागणी आ. राणांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Complaint to Election Commissioner of the EVM scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.