अडत्याने केली धान्य व्यापाऱ्याची फसवणूक, तक्रार दाखल
By Admin | Updated: October 11, 2015 01:45 IST2015-10-11T01:45:11+5:302015-10-11T01:45:11+5:30
येथील बाजार समितीचे परवानाधारक मेहरबाबा ट्रेडर्सचे संचालक मधुकर गावंडे यांचा माल अडत्याने न घेताच बाजार समितीच्या पुस्तकाद्वारे ...

अडत्याने केली धान्य व्यापाऱ्याची फसवणूक, तक्रार दाखल
पत्रपरिषद : मधुकर गावंडे यांची माहिती
चांदूररेल्वे : येथील बाजार समितीचे परवानाधारक मेहरबाबा ट्रेडर्सचे संचालक मधुकर गावंडे यांचा माल अडत्याने न घेताच बाजार समितीच्या पुस्तकाद्वारे बिलात वाढ करून फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी शनिवारी परिषदेत केली. याची रीतसर तक्रार चांदूररेल्वे ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
बाजार समितीत मधुकर गावंडे हे धान्य खरेदी व्यवसाय करतात. माल खरेदी करीत असताना एस.आर. झोपाटे यांनी तूर, चना खरेदी तारखेत माल न घेता बिले वजनात खोडाखोड, दरात तफावत भरती पोतेचे वजन वाढविणे असे करून ३ लाख ५४ रुपयांनी त्यांची फसवणूक केल्याची माहिती त्यांनी पत्रपरिषदेत दिली. याबाबत चांदूररेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे, पणन विभागीय सहायक निबंधक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. याबाबत सर्व चौकशीसाठी सहायक निबंधकांनी लेखा परीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु बाजार समितीने झोपाटे यांचेवर कार्यवाही न करता अडतेचा परवाना सुरू ठेवण्यात आला, असाही आरोप पत्र परिषदेत करण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर मी खरेदी केलेल्या धान्य मालाची दोन लाखांहून अधिक रक्कम झोपाटे दालाल यांची थांबविण्यात आली असून बाजार समितीने प्रदान केलेल्या मोहोर लावण्यात आलेल्या पुस्तकात धान्य मालाच्या बोगस पावत्या देणे या गंभीर बाबीकडे बाजार समितीने हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)