राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांविरुद्ध फसवणुकीची तक्रार

By Admin | Updated: July 17, 2016 00:02 IST2016-07-17T00:02:57+5:302016-07-17T00:02:57+5:30

एकाच फ्लॅटची दोनदा विक्री करून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश शिरभाते यांनी फसवणूक केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे.

Complaint of cheating against city president of NCP | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांविरुद्ध फसवणुकीची तक्रार

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांविरुद्ध फसवणुकीची तक्रार

अमरावती : एकाच फ्लॅटची दोनदा विक्री करून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश शिरभाते यांनी फसवणूक केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे. धवल जसापारा व विनोद लखोटीया (रा.महाविर सोसायटी, बुटी प्लॉट) यांनी संयुक्तरीत्या ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू झाली असून प्रकरण विधी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. तक्रारीनुसार राजेश शिरभाते यांनी सन २०१२ मध्ये तक्रारकर्त्यांना ६ लाख २५ हजार रुपयांत एक फ्लॅट विक्री केला होता. मात्र, त्या फ्लॅटमध्ये प्रशांत गुल्हाने राहत असल्याचे तक्रारकर्त्यांना समजले. फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी तक्रारकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

विधी अधिकाऱ्यांकडे प्रकरण वर्ग
अमरावती : त्यामुळे तक्रारदारांनी राजेश शिरभाते यांना विचारणा केली. मात्र, गुल्हाने यांना काही दिवस राहू देण्याची विनंती शिरभाते यांनी तक्रारदारांना केली. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. दरम्यान राजेश शिरभाते यांनी तोच फ्लॅट व काही मालमत्ता एका राष्ट्रीयीकृत बँकेत गहाण ठेवून ३ कोटींचे कर्ज उचलल्याची माहिती तक्रारकर्त्याला मिळाली. त्यानुसार त्यांनी महिनाभरापूर्वी राजेश शिरभातेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. याप्रकरणाची चौकशी सुरू असून विधी अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण पाठविण्यात आले आहे. शहरात संपत्तीसंदर्भातील फसवणुकीचे अनेक गुन्हे उघड झाले असून आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint of cheating against city president of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.