दुय्यम निबंधकाविरुद्ध वृद्धाची तक्रार

By Admin | Updated: February 5, 2016 00:20 IST2016-02-05T00:20:29+5:302016-02-05T00:20:29+5:30

तहसीलदारांच्या परवानगीनंतरही जमिनीची खरेदी करून देण्यास सहायक दुय्यम निबंधकांनी मानसिक त्रास दिला.

Complaint against the senior registrar | दुय्यम निबंधकाविरुद्ध वृद्धाची तक्रार

दुय्यम निबंधकाविरुद्ध वृद्धाची तक्रार

अचलपुरातील प्रकार : प्रकरण एसीबीकडे वर्ग
सुनील देशपांडे अचलपूर
तहसीलदारांच्या परवानगीनंतरही जमिनीची खरेदी करून देण्यास सहायक दुय्यम निबंधकांनी मानसिक त्रास दिला. तसेच खरेदीनंतर दहा हजार रुपयांची मागणी केली आणि धमकीही दिल्याची तक्रार वयोवृद्ध शेतकऱ्याने अचलपूर ठाण्यात केली.
अचलपूर येथील सहायक दुय्यम निबंधक काही ना काही कारणावरून वादग्रस्त ठरतात. याबाबत अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील वयोवृद्ध काशीनाथ रामकृष्ण तिडके (८८) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदारांनी ७ डिसेंबर २०१५ रोजी सहनिबंधकांना पथ्रोट येथील गट नं. १६/२ क्षेत्रफळ तिडके यांचे नावानी करून देण्यास कळविले. त्यानुसार १५ डिसेंबर रोजी निबंधकांच्या कार्यालयात गेले असता त्यांनी जिरायती व तुकडा जमीन असल्यामुळे खरेदी होत नाही, तहसीलदारांना विचारून कळवितो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ते तेथे गेले असता त्यांनी तेच उत्तर दिले. त्यामुळे वृद्धाने तहसीलदारांची भेट घेतली. त्यांनी निबंधकांना खरेदी करून देण्यास सांगितले. मात्र निबंधक अर्जुन बडधे यांनी एजंटामार्फत पैशाची मागणी केली. वृद्धाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर १८ डिसेंबर रोजी सायंकाळी वृद्धाच्या भ्रमणध्वनीवर फोन करून बडधे यांनी त्यांना धमकावले, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे निबंधक बडधे यांचेवर कडक कारवाई करावी, असेही तिडके यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने हे प्रकरण उघड झाले आहे.

Web Title: Complaint against the senior registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.