रवि राणांविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST2021-07-14T04:16:35+5:302021-07-14T04:16:35+5:30

पोस्टरला चढविला चपलांचा हार, आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसैनिकांचा पारा चढला परतवाडा : मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत अपशब्द व ‘मातोश्री’बद्दल ...

Complaint against Ravi Rana at Paratwada Police Station | रवि राणांविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

रवि राणांविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

पोस्टरला चढविला चपलांचा हार, आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसैनिकांचा पारा चढला

परतवाडा : मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत अपशब्द व ‘मातोश्री’बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावरून बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध स्थानिक शिवसैनिकांनी परतवाडा पोलीस स्टेशनला लिखित तक्रार दिली आहे.

शिवसैनिकांनी रविवारी दिलेल्या या तक्रारीत आमदार राणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यापूर्वी शिवसैनिकांनी जयस्तंभ चौकात त्यांच्या पोस्टरला चपलांचा हार घातला व बदडलेदेखील. आमदार राणांनी ‘मातोश्री’वर जाण्याआधी तालुक्यातील शिवसैनिकांच्या घरापुढे बेशरमचे झाड लावून दाखवावे, असे आव्हानदेखील शिवसैनिकांनी याप्रसंगी केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी ओमप्रकाश दीक्षित, नरेंद्र पडोळे, बंडू घोम, माणिक देशपांडे, विनय चतुर, युवा सेना शहर प्रमुख सागर वाटाणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Complaint against Ravi Rana at Paratwada Police Station