अमरावती-पुणे नवीन गाडीसाठी स्पर्धा वाढली
By Admin | Updated: May 15, 2015 00:01 IST2015-05-15T00:01:37+5:302015-05-15T00:01:37+5:30
पुणे- भुसावळ दरम्यान धावणारी रेल्वे गाडी अमरावती येथून १ जुलैपासून सुरु करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी झाली ...

अमरावती-पुणे नवीन गाडीसाठी स्पर्धा वाढली
अमरावती : पुणे- भुसावळ दरम्यान धावणारी रेल्वे गाडी अमरावती येथून १ जुलैपासून सुरु करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी झाली असताना खा.रक्षा खडसे यांनी गुरुवारी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी ही गाडी अमरावती येथून सुरु करण्यास जोरदार विरोध केला. त्यामुळे पुणे गाडीवरुन खा. खडसे विरुद्ध खा. अडसूळ असा संघर्ष उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अमरावती - पुणे गाडी यापूर्वी मनमाडपर्यंत धावत होती. त्यानंतर पुणे ते मनमाडदरम्यान ही गाडी सुरु होती. दरम्यान खा. आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र देऊन पुणे ते भुसावळ गाडी अमरावती येथून सुरु करावी, अशी मागणी रेटून धरली. त्यानुसार रेल्वेमंत्री प्रभू यांनी ९८२९ क्रमांकाची ही गाडी पुणे ते अमरावती दरम्यान सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता यात पुन्हा वाद उत्पन्न झाला.
संकेतस्थळावर माहिती
अमरावती- पुणे व्हाया पनवेल अशी सुपरफास्ट गाडी १ जुलैपासून अमरावती येथून सुरु करण्याचे प्रयोजन होते. त्यानुसार रेल्वेप्रशासनाने संकेतस्थळावर या गाडीची माहितीदेखील प्रसिध्द केली होती. ही गाडी अमरावती येथून सुरु करु नये, अशी मागणी खा. रक्षा खडसे यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.