अमरावतीला रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:17+5:302021-03-18T04:13:17+5:30
अमरावती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लॉकडाऊन व नंतरच्या चार महिन्यांच्या काळात उद्भवलेल्या संकटकाळाची आता वर्षपूर्ती होत आहे. या काळात ...

अमरावतीला रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन
अमरावती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लॉकडाऊन व नंतरच्या चार महिन्यांच्या काळात उद्भवलेल्या संकटकाळाची आता वर्षपूर्ती होत आहे. या काळात जिल्ह्यातील तब्बल २८८ सामाजिक संस्थांनी निरपेक्ष भावनेने मदतीचा हात दिला. शिवाय महापालिका व अन्य सामाजिक संस्थांनी रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन व काहींनी स्वतंत्रपणे मदतीचा हात दिला आहे.
कोरोना संकटकाळात २३ मार्चनंतरचे लॉकडाऊन व जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला कर्फ्यू व कोरोना संसर्गाबाबत उडणाऱ्या वावड्या यामुळे हजारो नागरिक बेरोजगार अन् बेघर झाले. अशा विपरीत परिस्थितीत मदतीचे हजारो हात पुढे आलेत. काही संस्था स्वत:हून, तर काहींनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आवाहनानंतर मदतीसाठी हात पुढे केले होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जलाराम ग्रूप, डॉ पंजाबराव देशमुख मेडीकल कॅालेजमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी उमेेश पनपालिया, सिमेश श्रॉफ ग्रुप, जिल्हा स्त्री रुग्णालयात गुरुद्वारा समिती, भक्तीधाममध्ये जयेश राजा, महेश भवन येथे बालाजी ट्रस्ट मंदिर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात हरिना फाऊंडेशन व रोटरी क्लब, बलगाव व अन्य ठकाणच्या बेघर कामगारांसाठी माहेश्वरीपंचायत, पोफली भवन येथे जेसीआय, सेल्टर होम येथे हॉटेल असोशिएशन तसेच ख्रिश्चन व मिशनरी अलायन्स येथे टी.एस लव्हाळे आदींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अन्नछत्र, दैंनंदिन वस्तू यासह बेघरांना निवारा व अन्य राज्यातील लोकांना त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली.
बॉक्स
हरिना फाऊंडडेशन
शहरात शिक्षणासाठी आलेल्या तेलंगना, आंध्र प्रदेशासह अन्य राज्यातील दोन हजारांवर विद्यार्थ्यांसाठी हरिना फाऊंडेरशनने मदतीचा हात दिला. विद्यार्थ्याचे होस्टेल व रुमवर दोन्ही वेळा अन्नाची पाकिटे देण्यात आली. गरजूंना दोन हजारांवर कीट व विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पोहचवून देण्यात आले.
बॉक्स
माहेश्वरी पंचायत
वलगाव तसेच दर्यापूर फाट्यावर अडकून पडलेले मजूर, पुनर्वसन पांढरी येथील अडकलेले मजूर यांना दोन्ही वेळच्या जेवणासह, शहरातील पीडीएमसी. इर्विन, दयासागर, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात चहा, खिचडी याशिवाय रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकाला जेवण पुरविण्याचे काम यासंस्थेने केले.
बॉक्स
गुरुद्वारा समिती
२२ मार्च ते ४ जुलै या काळात, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह बिल्डींग कामावर अडकलेले कामगार यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था, राजापेठ, बेलपुरा, झेंडा चौक या ठिकाणांसह झोपडपट्टी भागातील नागरिकांसह बडनेरा येथेही ५०० वर लोकांना अन्नदान करण्यात आले.