शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

संचारले नवचैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:15 PM

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेवसानजीक होणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणाच्या आदल्या दिवशी शनिवारी अमरावतीत भव्य दिंडी काढण्यात आली. जिल्हा व जिल्हाबाहेरून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. श्री गजानन महाराज यांच्या जयघोषाने अवघी अंबानगरी दुमदुमून गेली.शहराकरिता शनिवारी सकाळी चैतन्याची पहाट उगवली. महापारायण सोहळ्यापूर्वी दिंडी निघणार असल्याचे मॅसेज सर्वांना रवाना झाल्याने मोठ्या ...

ठळक मुद्देश्री संत गजाननांचा महापारायण सोहळाआठ तास दिंडीची परिक्रमा

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेवसानजीक होणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणाच्या आदल्या दिवशी शनिवारी अमरावतीत भव्य दिंडी काढण्यात आली. जिल्हा व जिल्हाबाहेरून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. श्री गजानन महाराज यांच्या जयघोषाने अवघी अंबानगरी दुमदुमून गेली.शहराकरिता शनिवारी सकाळी चैतन्याची पहाट उगवली. महापारायण सोहळ्यापूर्वी दिंडी निघणार असल्याचे मॅसेज सर्वांना रवाना झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक विवेकानंद कॉलनी येथे जमले होते. शहरातील प्रमुख मार्गाने काढलेल्या दिंडीत सुमारे पाच हजारांवर वारकऱ्यांनी सहभाग घेतला. मृदंग, टाळ, चिपड्या, डफ, ढोल यांच्या निनादाने अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते. दिंडीत हत्ती रथ, गजानन महाराजांच्या मूर्तीचा रथ घेऊन वारकºयांचा जयघोष सुरू होता. लहान मुले व पुरुषांनी पांढरे वस्त्र, तर महिलांनी गुलाबी व पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने दिंडीत वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. काही महिलांनी डोक्यावर तुळस घेतली.चौकाचौकांत झाली पुष्पवृष्टीशिस्तबद्ध दिंडीकरी आणि मार्गात स्वच्छतेसाठी सेवेकऱ्यांची चढाओढ हे प्रमुख आकर्षण ठरले. सकाळी ९ वाजता विवेकानंद कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. शहरातील विविध रस्त्यावरून दिंडीचे स्वागत करण्यात आले. पुष्पगुच्छ, फुलांचा वर्षावात दिंडी मार्गस्थ होत होती.दिंडी रुख्मिणीनगर, राजकमल, शाम चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, गाडगेनगर, शेगाव नाका, कठोरा नाका, नवसारी मार्गे दिंडी पारायणस्थळी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचली. दरम्यान दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चहा-पाण्यासह नास्ताची सुर्व सुविधा भाविकांनी केली.दिंडी मार्गात वारकऱ्यांना पाणी देण्याकरिता स्टॉल लागले होते. तेथे पोहोचून पाणी घेण्याऐवजी त्यांना सोबत असलेले सेवेकरी पाऊच-बॉटल पोहोचवून देत होते. याशिवाय त्यांच्याकडील रिकामे झालेले पाऊच गोळा करीत होते. विशेष म्हणजे, हे रिकामे पाऊच पोत्यात भरून ते दिंडीच्या सर्वांत मागे असलेल्या ट्रॅक्टरमध्ये पोहचविले जात होते. या ट्रॅक्टरच्या सोबतीने झाडू घेऊन असलेला युवकांचा गट मार्गात उर्वरित कचरा आणि रांगोळीवर टाकलेल्या फुलांचे निर्माल्य गोळा करण्याची काळजी घेत होता.‘लोकमत’तर्फे भाविकांना पाण्याचे वितरणदिंडी इर्विन चौकाकडून मोर्शी मार्गावर आल्यावर लोकमत युनिट कार्यालयासमोर दिंडीचे स्वागत करण्यात आले. पाणीपाऊचचे वितरण करून वारकºयांची तृष्णातृप्ती केली.राजकमल चौकात स्वागतराजकमल चौकात नवयुवक क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीवर पुष्पवर्षाव केला. दिंडीकºयांना पाणीपाऊच, चहा-नास्तासह फराळाचे वाटप केले.पालखी मार्गावर गर्दीदिंडी मार्गस्थ होत असताना तिचे भाविकांनी चौकाचौकात स्वागत केले. श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.स्वच्छतेसाठी सेवेकऱ्यांची चढाओढदिंडीत आयोजन समितीतर्फे स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पाणीपाऊच व नास्ता प्लेट गोळा करण्यासाठी सेवेकऱ्यांची चढाओढ दिसून आली. व्यावसायिक व उच्चपदस्थ अधिकारीही यामध्ये होते. ते रस्त्यावर पडलेले पाऊच व नास्ता प्लेट उचलून पोत्यात गोळा करीत होते.३० हजारांवर भाविकांची नोंदरविवारी होणाऱ्या महापारायणाचा उत्साह शनिवारच्या दिंडी सोहळ्याने द्विगुणित केला. महापारायणात ३० हजार भाविक सकाळी ७.२० पासून एकाच वेळी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणार आहेत.१८ दिंड्यांचा सहभागदिंडी सोहळ्यामध्ये एकूण १८ दिंड्यांचा सहभाग होता. प्रत्येक दिंडीच्या पुढे वाहनावर ध्वनिक्षेपकाची सोय करण्यात आली होती. दिंडीकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.