उमेदवारांच्या बँक खात्यावर आयोगाची नजर
By Admin | Updated: November 16, 2016 00:29 IST2016-11-16T00:29:39+5:302016-11-16T00:29:39+5:30
केंद्र सरकारने चलनात असलेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटा बाद केल्यानंतर नग़र पालिकेच्या ...

उमेदवारांच्या बँक खात्यावर आयोगाची नजर
प्रत्येकांच्या खात्याची माहिती घेणार : कॉर्नर सभांना सुरुवात, पाचशे व हजाराच्या नोटांची अडचण
धामणगाव रेल्वे : केंद्र सरकारने चलनात असलेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटा बाद केल्यानंतर नग़र पालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या बँक खात्यावर निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवली आहे़ पाचशे, हजारांच्या नोटा बदलविणे महागात पडणार आहे़ दरम्यान प्रत्येक खात्याची माहिती घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे़
जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूकीचे रणधुमाळीला गती आली आहे़ सर्वच राजकीय पक्षांच्या नगराध्यक्ष व ऩप़सदस्य पदाकरिता रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटले आहे़ एकीकडे कॉर्नर सभेला सुरूवात झाली आहे, तर दुसरीकडे उमेदवारांच्या मागे आता शंभरीचा तगादा काही मतदारांनी लावला आहे़ आपल्याकडे चिल्लर नसल्याची शक्कल काही उमेदवार लढवित असले तरी मोजके मतदार पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
बँक खात्यांची होणार चौकशी
नगरपरिषद निवडणुकीत नामांकन दाखल करताना सर्वच उमेदवारांना आपली संपत्ती नमूद या नामांकनात करावी लागली आहे़ जे बँकेचे खाते दिले आहेत आणि त्यात असलेल्या रक्कमेचा आकडा दिला आहे़, यामध्ये काही बदल होतेय का यासाठी निवडणूक आयोगाने बँक खात्याकडे बारीक लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाची निर्मिती केली आहे़ संबंधित उमेदवारांच्या खात्यात अचानकपणे पाचशे, हजार रूपयांच्या अडीच लाख रुपयांपर्यंत नोटांची रक्कम जमा झाली असेल अशा खात्याची चौकशी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत़
दररोज निवडणुकीचा खर्च उमेदवारांना सादर करणे बंधनकारक आहे़ नामांकन दाखल करताना दिलेल्या बँकांच्या खात्यात अवाजवी रक्कम संबंधित उमेदवार जमा करीत असेल, अशा खात्याची चौकशी निवडणूक विभागाच्यावतीने होणार आहे़
- नरेंद्र फुलझेले,
निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषद