आयुक्तांनी केली प्रथमेश, छत्रीतलावाची पाहणीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:58+5:30

आरोग्य विभागाद्वारा गणेशोत्सव मार्गांची दैनंदिन साफसफाई व आरोग्य विषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करावे, विसर्जन स्थळी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, प्राथमिक आरोग्य पथक अ‍ॅम्बुलन्ससह सज्ज ठेवणे तसेच आवश्यक ठिकाणी पाण्यातील गाळ व कचरा काढावा.

Commissioner inspects Prathamesh, Chhatri Lake | आयुक्तांनी केली प्रथमेश, छत्रीतलावाची पाहणीं

आयुक्तांनी केली प्रथमेश, छत्रीतलावाची पाहणीं

ठळक मुद्देसंडे अँकर । गणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज : महापालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गणेश विसर्जनासाठी छत्री तलावासह साकारण्यात येणाºया कृत्रिम प्रथमेश जलाशयावर मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. याअनुषंगाने महापालिकेद्वारा केलेल्या सुविधांची महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यासंबंधित सुधारणांविषयी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
आरोग्य विभागाद्वारा गणेशोत्सव मार्गांची दैनंदिन साफसफाई व आरोग्य विषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करावे, विसर्जन स्थळी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, प्राथमिक आरोग्य पथक अ‍ॅम्बुलन्ससह सज्ज ठेवणे तसेच आवश्यक ठिकाणी पाण्यातील गाळ व कचरा काढावा. आर्टिफिशीयल टँक ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी सहायक आयुक्त अमित डेंगरे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता भास्कर तिरपुडे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक एस.एस. पळसकर, अभियंता नितीन बोबडे, स्वास्थ्य निरीक्षक पंकज तट्टे उपस्थित होते. पशुवैद्यकीय विभागामार्फत गणेशोत्सव विसर्जना काळात रस्त्यावरील व विसर्जन परिसरात मोकाट गुरे पकडण्याची व्यवस्था करावी. ते आढळणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. उद्यान विभागामार्फत विसर्जनाच्या मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटणे तसेच अग्निशमन विभागाने विसर्जन स्थळी आपत्कालीन पथक तैनात ठेवण्याचे निर्देश दिले आहे. अतिक्रमण विभागामार्फत विसर्जनस्थळी दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करण्यात येत आहे. कृत्रिम तलावाचे रुंदीकरण व खोलीकरण करावे, अग्निशमन विभागाने विसर्जनस्थळी पथक सज्ज ठेवावे, प्रकाश व्यवस्था, सी.सी.टी.व्ही. व जनरेटर लावण्याचे निर्देश दिलेत. बांधकाम विभागाने विसर्जनाच्या रस्त्यावरील खड्डे जेट पॅचर अथवा खडी, मुरुम भरून बुजविले आहे. विसर्जनस्थळी मंडप, बॅरीकेडिंग, स्टेज व इतर आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात.

Web Title: Commissioner inspects Prathamesh, Chhatri Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.