शेतकऱ्यांच्या बांधावर खतपुरवठ्याला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:14+5:302021-05-19T04:13:14+5:30
शेतकरी गट, समूहाद्वारे वितरण, आमदारांची उपस्थितीदर्यापूर : लॉकडाऊनमुळे तालुक्यातील कृषिसेवा केंद्रे बंद असल्याने खरीप हंगामात पेरणीच्या नियोजनात खोळंबा होत ...

शेतकऱ्यांच्या बांधावर खतपुरवठ्याला प्रारंभ
शेतकरी गट, समूहाद्वारे वितरण, आमदारांची उपस्थितीदर्यापूर : लॉकडाऊनमुळे तालुक्यातील कृषिसेवा केंद्रे बंद असल्याने खरीप हंगामात पेरणीच्या नियोजनात खोळंबा होत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहचविण्यास शेतकरी/गट समूहामार्फत दर्यापूर तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे. १८ मे रोजी या उपक्रमाचा प्रारंभ होत असताना आमदार बळवंत वानखडे उपस्थित होते.
दर्यापूर तालुका कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी गटामार्फत मोबाईल-व्हाॅट्सॲपद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन बूकिंग करून विक्री केंद्रामार्फत घरपोच निविष्ठा पोहचवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याप्रसंगी आमदारांसह उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार योगेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी उद्धव भायेकर, मंडळ कृषी अधिकारी घनश्याम कळस्कार, प्रदीप देशमुख, सुनील गावंडे, साखरे, महेंद्र भांडे, राजू गावंडे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष मधुकरराव तराळ, गजानन जाधव, आशिष राठी, श्रवण लड्डा, मुरारी खंडेलवाल, रोहित गणोरकर आदी उपस्थित होते.