महाविद्यालयस्तरावरील बॅकलॉग परीक्षांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:57+5:302021-04-08T04:13:57+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेशित कॉलेजमध्ये होणार ...

महाविद्यालयस्तरावरील बॅकलॉग परीक्षांना प्रारंभ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेशित कॉलेजमध्ये होणार आहे. बुधवारी ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
एमसीक्यू पद्धतीने या परीक्षा होणार आहे. अभ्यासक्रमातील गुणांनुसार ६० अनुपातात गुण विद्यार्थ्यांना दिले जातील, अशी नियमावली आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशित महाविद्यालयात घेण्यात येत आहे. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत १२ हजार ५०० बॅकलॉग विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, कंट्रोल शीट, रोल नंबर आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली. लर्निंग स्पायरल एजन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा कॉलेज लॉगीनमधून होणार आहे. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना ४० पैकी २० प्रश्न सोडवावे लागणार आहे.
अभियांत्रिकीच्या बॅकलॉग परीक्षा ६ ते १० एप्रिल दरम्यान घेण्यात येतील. अभियांत्रिकी वगळता अन्य अभ्यासक्रमाच्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.
बॅकलॉग परीक्षांसाठी महाविद्यालयांनाच प्रश्नपत्रिका तयार करायच्या असून, प्रचलित पद्धतीने विद्यापीठात गुण पाठवावे लागणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने बॅकलॉग विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. महाविद्यालयाने कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका काढली, त्याची प्रत विद्यापीठाला पाठवावी लागेल. अन्यथा त्या महाविद्यालयांचे निकाल जाहीर होणार नाही, अशी अट लादण्यात आली आहे.
-------------
लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच विद्यापीठाच्या परीक्षा घोषित झाल्या होत्या. महाविद्यालय स्तरावर या परीक्षा हाेणार असल्याने विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास नाही. कोरोना नियमावलींचे पालन करुनच परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे.
-हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ