शहिदाच्या कुटुंबीयांचे सांत्वन
By Admin | Updated: October 13, 2016 00:33 IST2016-10-13T00:33:38+5:302016-10-13T00:33:38+5:30
जम्मू-काश्मिरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नांदगाव शहरातील...

शहिदाच्या कुटुंबीयांचे सांत्वन
दिलासा : राकाँ प्रदेशाध्यक्षांची भेट
नांदगाव खंडेश्वर : जम्मू-काश्मिरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नांदगाव शहरातील शहीद जवान विकास उईके यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट घेवून सांत्वन केले.
या सांत्वन भेटीदरम्यान शहीद विकासच्या आई, वडिलांनी आपला एक मुलगा देशरक्षणार्थ शहीद झाला असून दुसरा मुलगा देशरक्षणासाठी लष्करात दाखल करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी सुनील तटकरे यांनी देशाभिमान बाळगणाऱ्या अशा कुटुंबाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बसोराज पाटील रा.काँ. प्रदेश सरचिटणीस, अतुल लोंडे प्रदेश प्रवक्ता, आ. संदिप बाजोरिया, वसंत घुईखेडकर, मो. जावेद, शरद देवरणकर, अरविंद चोरे, श्रीकृष्ण रंगाचार्य, धनराज रावेकर (बांधकाम सभापती), किशोर गुलालकरी, न्यामत खाँ उस्मान खाँ, अजय धानोरकर, किशोर भेंडे, पंकज ठाकरे, सै. अबरार सै. कमाल, जफर उपस्थित होते.