महाविद्यालये कडेकोट बंद
By Admin | Updated: September 4, 2015 00:32 IST2015-09-04T00:32:46+5:302015-09-04T00:32:46+5:30
राज्यात छात्रसंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने अध्यादेश काढून या निवडणुका रद्द केल्यामुळे ...

महाविद्यालये कडेकोट बंद
उत्स्फूर्त प्रतिसाद : छात्रसंघ निवडणुका रद्द केल्याचा निषेध
अचलपूर : राज्यात छात्रसंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने अध्यादेश काढून या निवडणुका रद्द केल्यामुळे ३ सप्टेंबर रोजी युवक काँग्रेस व एनएसयूआयने शहरातील सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. हा बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. सर्व महाविद्यालये गुरुवारी कडेकोट बंद होती.
गुरूवारी सकाळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सर्व महाविद्यालयांना भेट देऊन त्यांना विद्यार्थी हित लक्षात घेता महाविद्यालयांचे कामकाज बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या बंदला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्थानिक भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय, स्व. छ.मु. कला महाविद्यालय अािण जगदंब महाविद्यालय या तिन्ही महाविद्यालयात गुरूवारी शुकशुकाट होता.
आंदोलनासाठी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल येवले, सागर व्यास, अमोल बोरेकार, राहुल गाठे, निलेश डांगे, उज्वल तिवारी, अंकित शिंगे, कुलजीत शर्मा, धीरज खुरतने, सचिन चऱ्हाटे, मो. अलमास, राजेश मेटकर, रोशनी ढाकुलकर, सनिश्पा तिवारी, आशिष बदरके आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे बंदचे आयोजन करून शासनाच्या धोरणाच निषेध करण्यात आला.
छात्रसंघाच्या निवडणुका आकस्मिकरित्या रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध विद्यार्थ्यांनी महाविद्यालये बंद ठेऊन केला. युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा बंद ठेवण्यात आला.
(तालुका प्रतिनिधी)