शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टावर फेक अकाउंट बनवून कॉलेज फ्रेंडने तरुणीचे लग्न मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:01 IST

'ती'च्या नियोजित वराला फेक मेसेज : १५ डिसेंबरला होते लग्न

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील एका ३० वर्षीय तरुणीच्या नियोजित वराला फेक मेसेज पाठवून तिचे १५ डिसेंबर रोजी होऊ घातलेले लग्न मोडण्यात आले. तिच्याच कॉलेजमेटने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून तिची बदनामी केली. याप्रकरणी, त्या तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी संशयित आरोपी धर्मेश योगेश तन्ना (वय ३०, रा. हिवरखेड, ता. तेल्हारा) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये व एकाच वर्गात शिकत होते. तेव्हापासून आरोपी हा तरूणीचा पाठलाग करून लग्न कर म्हणून बळजबरी करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ती अमरावतीला भावाकडे आली. त्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी पुणे येथील विनय नामक तरुणासोबत तिचे लग्न जुळले. साक्षगंधदेखील झाले. १५ डिसेंबर रोजी लग्नाची तारीख काढण्यात आली. तरुणीचे लग्न ठरल्याचे माहीत होताच आरोपीने १५ ते २० सप्टेंबरदरम्यान फिर्यादी तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फ्लॅश मेसेज पाठवले. त्यामध्ये अश्लील शिवीगाळ व तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी होती. 

'तो मी नव्हेच'चा बनाव काही दिवसांनी आरोपी धर्मेश तन्ना याने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनविले. तथा त्यावरून तरुणीच्या नियोजित वराला खोटे मेसेज केले. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या मुलीबद्दल मला काही सांगायचे आहे. तुम्हाला माहिती नाही की, त्या मुलीचे किती मुलांशी संबंध होते. तिच्या अशा वागण्यामुळे तिला तिच्या घरच्यांनी अमरावतीला पाठविले आहे. तिचे तिच्या वहिनीचा भाऊ धर्मेश तन्ना याच्यासोबत देखील संबंध असल्याचे मेसेज पाठविले. त्यामुळे फिर्यादीचे लग्न तुटले. आरोपीने त्याच्यावर संशय येऊ नये, म्हणून स्वतःला देखील तसे मेसेज व काही अश्लील फोटो पाठवून फिर्यादीला दाखविले. आपल्याला देखील तसेच मेसेज येत असल्याचा बनाव त्याने रचला. मात्र, तो बनाव त्याचा मोबाईल चेक केला असता उघड झाला. त्यामुळे तरुणीने ठाण्यात धाव घेतली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी