महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST2021-07-19T04:10:36+5:302021-07-19T04:10:36+5:30
अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहे. ऑनलाईन, ...

महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण
अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहे.
ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांचा पर्याय ठेवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
कोरोना नियमावली पुढे देखील सुरू राहील, असे संकेत यूजसीने दिले आहेत. परिस्थितीनुसार महाविद्यालयीन परीक्षा अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या घेण्यात येतील. शाखानिहाय परीक्षा घेताना सत्र २, सत्र ४ हे अंतर्गत गुण ५० आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बारावीचा निकाल जाहीर होताच महाविद्यालीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठांना कार्यवाही करावी लागेल. साधारणत: १ ऑक्टोबरपासून प्रथम वर्षाचे शैक्षणिक सत्र आरंभण्याची तयारी महाविद्यालयांना करावी लागणार आहे. यूजीसीच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी विद्यापीठांनी तयारी चालविली आहे.
---------------------
कोट
यूजीसीचे पत्र नव्या शैक्षणिक सत्राबाबत गाईडलाईन मिळाल्या आहेत. परीक्षा, निकाल, प्रवेशाबाबतच्या सूचनांचे पालन करण्यात येतील. महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ.