अमरावतीत जिल्हाधिकाऱ्यांची व्हिजिट, ९३ कर्मचारी लेटलतिफ

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 26, 2023 17:20 IST2023-07-26T17:19:45+5:302023-07-26T17:20:15+5:30

बुधवारीदेखील जिल्हाधिकारी कटियार सकाळी ९.४० च्या सुमारास कार्यालयात पोहोचले व त्यांनी सर्व विभागाला भेटी दिल्या.

Collector's visit to Amravati, 93 personnel late | अमरावतीत जिल्हाधिकाऱ्यांची व्हिजिट, ९३ कर्मचारी लेटलतिफ

अमरावतीत जिल्हाधिकाऱ्यांची व्हिजिट, ९३ कर्मचारी लेटलतिफ

अमरावती : जिल्हधिकारी सौरभ कटियार स्व:ता ९.३० ते ९.४० दरम्यान कार्यालयात उपस्थित राहत आहे. त्यांनी सोमवार व बुधवार या दोन्ही दिवशी सकाळी सर्व विभागाची पाहणी केली. सोमवारी त्यांनी कामकाज जाणून घेतले तर बुधवारच्या त्यांच्या आकस्मित भेटीत तब्बल ९३ अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले.

जिल्हधिकारी कटियार यांनी पहिल्या दिवशी घेतलेल्या पत्रपरिषेत आपण स्व:ता रोज सकाळी ९.३० वाजता कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी पदभार देखील सकाळी ९.३० ला घेतला व त्यानंतर सर्व विभागांना भेट देत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्याकडून माहिती जाणून घेतली होती.

बुधवारीदेखील जिल्हाधिकारी कटियार सकाळी ९.४० च्या सुमारास कार्यालयात पोहोचले व त्यांनी सर्व विभागाला भेटी दिल्या व पाहणी केली. यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे व बायोमेट्रीक मशीन बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे सर्व मशीन अपडेट करुन लावण्याचे निर्देश त्यांनी आस्थापना विभागाला दिले.

Web Title: Collector's visit to Amravati, 93 personnel late