जिल्हाधिकारी पोहोचले रिद्धपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:23+5:302021-01-23T04:12:23+5:30

फोटो पी २२ कलेक्टर रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे पर्यटनक्षेत्र निधी अंतर्गत २२ कोटी ३५ लाख रुपयांचे काम सुरू ...

Collector reached Ridhpur | जिल्हाधिकारी पोहोचले रिद्धपुरात

जिल्हाधिकारी पोहोचले रिद्धपुरात

फोटो पी २२ कलेक्टर

रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे पर्यटनक्षेत्र निधी अंतर्गत २२ कोटी ३५ लाख रुपयांचे काम सुरू आहे. त्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल २१ जानेवारी रोजी रिद्धपुरात पोहोचले. थीम पार्क लगतच्या खदान परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, खालच्या बाजूने पर्यटन यात्री निवास ते थीम पार्कपर्यंत रस्ता करण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र वाईनदेशकर यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

रिद्धपूर ते जालनापूर रस्त्यावरील पूल व संरक्षण भिंतीची पाहणी करत असताना, तेथे पूल बांधकामाची मागणी रेटून धरण्यात आली. दाभेरी येथील गोविंद प्रभू व चक्रधर स्वामी मंदिराला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी महंत कारंजेकर बाबा, महंत वाईन्देशकर बाबा, उपविभागीय अभियंता प्रशांत सोळंके, उपअभियंता भारत दळवी, नायब तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे, सरपंच गोपाल जामठे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, उपसरपंच साबीरभाई, ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके, प्रवीण जावरकर, प्रमोद हरणे, पंकज हरणे, कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, मंडळ अधिकारी युवराज वंजारी, तलाठी राजेश संतापे उपस्थित होते.

----------------

Web Title: Collector reached Ridhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.