जिल्हाधिकारी, सीईओ मेळघाटातील मजुरांसोबत
By Admin | Updated: April 28, 2015 00:19 IST2015-04-28T00:19:53+5:302015-04-28T00:19:53+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २९ एप्रिल बुधवार रोजी एक दिवस मजुरांसोबत..

जिल्हाधिकारी, सीईओ मेळघाटातील मजुरांसोबत
२९ एप्रिलचा मुहूर्त : 'रोजगार हमी योजनेचा एक दिवस' उपक्रम
अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २९ एप्रिल बुधवार रोजी एक दिवस मजुरांसोबत या संकल्पनेंतर्गत जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी हे धारणी तालुक्यातील रोहयोच्या कामावरील मजुरांसोबत एक दिवस राहणार आहेत. सायंकाळी पायविहीर या गावात या अधिकाऱ्यांचा मुक्काम सुध्दा राहणार आहे
या निमित्त प्रशासनाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत रोहयोच्या नियोजन विभागाचे उपसचिव आर. विमला यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी सुचना दिल्या आहेत. सदर आदेश २३ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी केवळ प्राप्त निधींचे सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना वाटप करता उपक्रम परिणामकारक व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
औपचारिकता नको
हा उपक्रम आयोजित करताना औपचारिकपणे अथवा कागदोपत्री राहू नये, याची दक्षता घेण्यासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या उपक्रमात अधिकाधिक मजूर सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करावे शिवाय मजुरांना इतरही योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश आहेत.
नोडल अधिकारी नियुक्त
नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पंचायत, मंडळ अधिकारी महसूल, नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी यांना नियुक्त करावे. नोडल अधिकाऱ्यांनी उपक्रमांचे आयोजन करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देवून मजुरांसमवेत एक दिवसाचे नियोजन करण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर राहणार आहे.