शेतकऱ्यांचे सामूहिक मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:18 IST2016-11-19T00:18:18+5:302016-11-19T00:18:18+5:30

शेतकरी हितासाठी लढणारे, त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलने करणारे युवा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ...

Collective shaved | शेतकऱ्यांचे सामूहिक मुंडण

शेतकऱ्यांचे सामूहिक मुंडण

देवेंद्र भुयारच्या तडीपारीचा निषेध : शिख समुदायाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वरूड : शेतकरी हितासाठी लढणारे, त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलने करणारे युवा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या विरूद्ध कटकारस्थान रचून गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. सर्वसामान्यांच्या हक्कांकरीता तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या युवा नेत्यावर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. देवेंद्र भुयारांची तडीपारी रद्द न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे.
शेतकरी एकीकडे दुष्काळाशी दोन हात करीत असताना प्रशासनाकडून मुस्कटदाबी होत होती तर कर्जबाजारीपणामुळे जप्ती आदेश काढले जात होते. खचलेल्या विहिरीच्या अनुदानाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने युवा स्वाभीमानी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी सतत ९ वर्षांपासून शेतकऱ्यांकरीता आंदोलने, धरणे, मोर्चे काढून संघर्ष केला. या आदोलनांदरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर उपविभागिय अधिकारी,मोर्शी यांनी शिक्कामोर्तब केले.
यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला. या तडीपारीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक तहसील कार्यालयापुढे शेकडा ेशेतकऱ्यांनी मुंडनकरुन देवेंद्र भूयार यांच्या तडीपारीचा निषेध केला व ही तडीपारी रद्दकरण्याची मागणी केलीे. तर शहरातील शिख बांधवांनी सुध्दा समाजसेवक तसेच शेतकरी नेते देवेंद्र भुयार यांच्या तडीपारीविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून तातडीने तडीपारी रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्वाभिमानी ेशतकरी संघटना तसेच तालुक्यातील शेतकरी जेलभरो आंदोलन करण्याची तयारी करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. यावेळी शैलेश ढोबळे, ऋषिकेश राउत, मंगेश ठाकरे, उमेश डबरासे, भगवंत वानखडे, प्रफुल्ल अनासाने, जगबीरसिंग भावे, सतनामसिंग बावरी, मनोजसिंग भावे, नखानसींग पव्वा, समदरसिंग बावरी, कृणालसिंग बावरी, गोविंदसिंग बावरी, रॉबिनसींग भावे, अजयसिंग बावरी, ओंकार बोहरूपी, कैलास अमझरे, मनीष बोहरुपीसह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Collective shaved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.