सिंधी सोशल ब्युरोतर्फे सामूहिक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:25+5:302021-02-05T05:29:25+5:30

अनोळखी वृद्धेचा मृतदेह आढळला अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत व्हीएमव्ही रोडनजीक७० वर्षीय मृतदेह आढळला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी ...

Collective Holi by Sindhi Social Bureau | सिंधी सोशल ब्युरोतर्फे सामूहिक होळी

सिंधी सोशल ब्युरोतर्फे सामूहिक होळी

अनोळखी वृद्धेचा मृतदेह आढळला

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत व्हीएमव्ही रोडनजीक७० वर्षीय मृतदेह आढळला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान उघड झाली. पोलीस सूत्रानुसार, सदर वृद्धेची उंची ५ फुट, सडपातळ बांधा, निमगोरा, शरीराची हाडे झिजलेली असून, ओळख पटल्यास गाडगेनगर ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

तळेगाव दशासर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

तळेगाव दशासर : प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दशासर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाट्न जि.प. सदस्य अनिता मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. ही मोहीम तालुका अधिकारी हर्षल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. १९ गावात २५ बूथ व दोन ट्रांझिट टीम आणि ६ मोबाईल टीमव्दारा एकूण अपेक्षित २२५३ लाभार्थींपैकी १८९० बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मयूर मस्के, भावना तायडे, प्रमोद भावेकर, आ. सहा. संजय इंगळे, लांडगे, संतोष वायकोळे, संदीप चुळबूळकर, मनोज सरदार, आरोग्य सेवक कचरे, गुल्हाने, वानखडे, सुरवाडे, समुदाय आरोग्य अधिकारी वाढवे, निकम, चक्रे बनसोड, देशमुख, गोमासे, वाहन चालक रुपेश उडाखे, गटप्रवर्तिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Collective Holi by Sindhi Social Bureau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.