अमरावतीत शिकस्त इमारत पडली, काही मजूर दबल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:40 PM2022-10-30T14:40:02+5:302022-10-30T14:42:53+5:30

स्थानिक प्रभात सिनेमाजवळील दुमजली शिकस्त इमारत रविवारी दुपारी 1 च्या सुमारास कोसळली.

Collapsed building in Amravati some labourers feared trapped | अमरावतीत शिकस्त इमारत पडली, काही मजूर दबल्याची भीती

अमरावतीत शिकस्त इमारत पडली, काही मजूर दबल्याची भीती

googlenewsNext

मनीष तसरे
अमरावती : स्थानिक प्रभात सिनेमाजवळील दुमजली शिकस्त इमारत रविवारी दुपारी 1 च्या सुमारास कोसळली. त्यात सुमारे चार ते पाच मजूर दबल्याची भीती व्यक्त  होत आहे. महापालिकेने चार वर्षांपूर्वीच व्यावसायिक दुकानें असलेली ती इमारत अतिशीकस्त म्हणून पडण्याचे निर्देश सबंधिताला दिले होते. तेथे ही इमारत अतिशीकस्त आहे असे फलक देखील लावण्यात आले होते.

दरम्यान दोन तीन दिवसापासून ती इमारत पाडण्याचे काम सुरु होते. आज रविवारी दुपारी 1 च्या सुमारास पाडकाम सुरु असताना इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला. त्यात चार ते पाच मजूर दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली. महापालिकेची यंत्रणा पोहोचण्यापूर्वी लोकांनी स्वतःच कुदळे फावडे घेऊन मदत कार्य अवलंबविले होते.

सुमारे 2 च्या सुमारास महापालिकेची अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. सोबतच सिटी कोतवालीचे पोलीस अधिकरी व कर्मचारी देखील पोहोचले असून मदत कार्याला वेग देण्यात आला आहे.

Web Title: Collapsed building in Amravati some labourers feared trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.