परतवाड्यात कोल्ड स्टोेरेज, जिनिंग प्रेसिंगचा प्रस्ताव

By Admin | Updated: July 31, 2016 23:58 IST2016-07-31T23:58:14+5:302016-07-31T23:58:14+5:30

दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या कोट्यवधी रूपये किमतीच्या सहा एकर जागेवर शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज ...

Cold storage in the backyard, the proposition of the ginning pressing | परतवाड्यात कोल्ड स्टोेरेज, जिनिंग प्रेसिंगचा प्रस्ताव

परतवाड्यात कोल्ड स्टोेरेज, जिनिंग प्रेसिंगचा प्रस्ताव

कोट्यवधींची जागा पडून : राजेंद्र शिंगणेंकडून फेडरेशनच्या जागेची पाहणी
नरेंद्र जावरे परतवाडा
दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या कोट्यवधी रूपये किमतीच्या सहा एकर जागेवर शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज आणि अत्याधुनिक जिनिंग प्रेसिंग साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासंदर्भात शनिवारी फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजीमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या जागेची पाहणी केली.
विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनची दोन दिवसीय बैठक चिखलदरा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी शनिवारी अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, उपाध्यक्ष सुभाष धोटे, अचलपूर बाजार समितीचे सभापती अजय पाटील, पद्मा भडांगे, सुनील केदार, सुरेश देशपांडे, जयंत बैरागडे, ययाती नाईक, संतोषकुमार कोरपे, अरविंद पोरेट्टीवार, सुहास तिडके, दिलीप काळे, व्यवस्थापक एस.हरिबाबू, मीना मोहितकर, विलास निस्ताने आदी २१ संचालक व अधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र शिंगणे यांना राष्ट्रवादी पक्षासंदर्भात छेडले असता, ते म्हणाले, नुकतीच पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.
त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेळावे घेण्याचे सुचविण्यात आले. भाजपचे शासन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार काय, या प्रश्नाच्या उत्तरादाखल शिंगणेनी केवळ स्मितहास्य करून वेळ मारून नेली. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला पूर्ण ताकदीने लागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

-तर शेतकऱ्यांना होणार फायदा
चिखलदरा येथे आयोजित विदर्भ फेडरेशनच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाताना फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणेंसह इतर संचालकांनी सहा एकर जागेची पाहणी केली. परिसरात कोल्ड स्टोरेज व आधुनिक उपकरणांनी युक्त जिनिंग-प्रेसिंग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे शिंगणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात तो प्रस्ताव येण्याची अपेक्षा त्यांनी वर्तविली. येथे कोल्ड स्टोरेज झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा संभवतो.

हैद्राबाद, केरळात जातो संत्रा
अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन घेतले जाते. सोबतच केळी, डाळिंब, भाजीपाला आणि कडधान्याचा समावेश आहे. मात्र येथील संत्रा उत्पादकांसह इतर शेतपिकांसाठी कोल्ड स्टोरेजची सोय नाही. परिणामी लाखमोलाने पिकविलेले पीक अत्यल्प दरात व्यापाऱ्यांना विकावे लागते. दुसरीकडे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनची सहा एकर जागा नुसती पडून आहे. सन २००४ पासून या जागेचा वापर नाही. या पडीक जागेचा योग्य उपयोग व्हावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

परतवाडा येथील सहा एकर जागेवर कोल्ड स्टोरेज व आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञानाने युुक्त असे अद्ययावत जिनिंग-प्रेसिंग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल.
- राजेंद्र शिंगणे,
अध्यक्ष, दि.विदर्भ फेडरेशन

अचलपूर तालुक्यात कोल्ड स्टोरेज व जिनिंग-प्रेसिंग झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यासाठी सहा एकर जागा वापरण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील.
- अजय टवलारकर,
संचालक, बाजार समिती

Web Title: Cold storage in the backyard, the proposition of the ginning pressing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.