शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

प्रॅक्टिससाठी बळजबरी; डॉक्टर महिलेचे जिणे मुश्कील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:01 IST

तक्रारीनुसार, पीडिताचे डिसेंबर २०१५ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर विविध कारणांसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. लग्नानंतर रिजवानखान पटेल याने फेब्रुवारी २०१६ मध्ये पीडितेकडून वैद्यकीय उपाचाराकरिता दोन लाख रुपये घेतले. त्यादरम्यान, पीडिताला मुलगा झाला. त्यानंतर तिने मंगरूळपीर येथेच डॉक्टरची प्रॅक्टिस करावी, म्हणून दबाव आणला. वैद्यकीय व्यवसायातून आलेली रक्कमदेखील पती व अन्य जणांनी आपल्याकडून हिसकावून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रॅक्टिससाठी बळजबरी करून एका डॉक्टर महिलेचे जिणे मुश्कील करण्यात आल्याचा प्रकार येथे उघड झाला आहे. डॉक्टरकीच्या व्यवसायातून आलेल्या रकमेसह सासरच्या मंडळीने लग्नातील दागिने, भेटवस्तूदेखील हिसकून घेतल्या. याप्रकरणी १५ सप्टेंबरला दुपारी नागपुरीगेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. डॉक्टर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिजवान खान रियासत खान पटेल, रियासत खान पटेल व तीन महिला (सर्व रा. सुभाष चौक, दरगाह रोड, मंगरूळपीर, जि. वाशिम) यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, पीडिताचे डिसेंबर २०१५ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर विविध कारणांसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. लग्नानंतर रिजवानखान पटेल याने फेब्रुवारी २०१६ मध्ये पीडितेकडून वैद्यकीय उपाचाराकरिता दोन लाख रुपये घेतले. त्यादरम्यान, पीडिताला मुलगा झाला. त्यानंतर तिने मंगरूळपीर येथेच डॉक्टरची प्रॅक्टिस करावी, म्हणून दबाव आणला. वैद्यकीय व्यवसायातून आलेली रक्कमदेखील पती व अन्य जणांनी आपल्याकडून हिसकावून घेतली. हा छळ सुरूच राहिल्याचे पीडिताने म्हटले आहे. दरम्यान, पीडिताने पती, सासरा व सासरच्या अन्य मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलटपक्षी त्यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले तरच नांदवू, अशी धमकी दिली. जुलै २०१७ ते जुलै २०१९ दरम्यान पीडिता ही माहेरी अमरावतीला असताना तीन लाख रुपयांची व्यवस्था करा, अन्यथा तिला तुमच्याकडेच ठेवा, अशी धमकी फोनवरून तिच्या भावाला, कुटुंबीयांना देण्यात आली. बहिणीला त्रास नको, म्हणून तिच्या भावाने एक लाख रुपये मंगरूळपीर येथे नेऊन रियासतखान पटेल याच्याकडे दिले. ते घेतल्यानंतर उर्वरित दोन लाख रुपये त्वरित द्या, अन्यथा पीडितेला आणखी त्रास देण्याची धमकी देण्यात आली. दरम्यानच्या काळात तिच्याकडील दागिने व भेटवस्तू हिसकावण्यात आल्या. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. प्रकरण महिला सहायता कक्षाकडे पाठविण्यात आले. मात्र, तेथे आपसी समझोता झाला नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने १५ सप्टेंबर रोजी पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय संदीप हिवाळे करीत आहेत.

तक्रारकर्ती महिला व्यवसायाने डॉक्टर आहे. तिच्यावर पती व सासरच्या अन्य मंडळीने मंगरूळपीर येथेच प्रॅक्टिस करण्यासाठी दबाव आणला. त्यातून आलेली रक्कम, लग्नातील दागिने हिसकल्याची तक्रार नोंंदवून घेतली. पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. - पुंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरीगेट

 

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिस