शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ज्येष्ठांच्या लसीकरणाला को-विन ॲपचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेत नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या आठ खासगी रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन गुरुवारपासून सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देको-मॉर्बेडिट नागरिकांना लसीकरणासाठी प्रमाणपत्र बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या ज्येष्ठांसह सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू आहे. या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे महपालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीन दिवसांत ५८० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान चवथ्या दिवशीही को-विन ॲपचा खोडा कायम होता.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेत नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या आठ खासगी रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन गुरुवारपासून सुरू करण्यात आले. दरम्यान, महापौर चेतन गावंडे यांनी बुधवारी पीडीएमसी व डेंटल कॉलेजमधील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. 

महापालिकेने स्थापन केले इमर्जंसी बुथलसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर ‘कोविन. जीओव्ही.इन’ या वेबसाईटवर भरून येणाऱ्या ओटीपीनुसार नोंदणी करून लसीकरणाची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकता. रिझर्व्ह स्लॉटमध्ये स्वत: नोंदणी करणे शक्य नाही, असे लाभार्थी महापालिकेने स्थापन केलेल्या बुथवर आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात.

ही कागदपत्रे महत्त्वपूर्णलसीकरणासाठी ६० वर्षांवरील नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र इत्यादी वयाबाबतच्या योग्य पुराव्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी वयाच्या पुराव्यासोबतच वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकाकडून विहीत नमुन्यात प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रावर दाखविणे अनिवार्य आहे.

को-मॉर्बेडिटी रुग्णांना प्रमाणपत्र अनिवार्यको-मॉर्बेडिटीमध्ये पल्मनरी आर्चरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन, डायबेटीज ऑन ट्रिटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन, डायबेटीज ऑन ट्रिटमेंट व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.

खासगीत २५० रुपये डोज, शासकीय मोफत महापालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक डोज मोफत देण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, सीव्हीसी नोंदणीकृत रुग्णालयात लस घेण्यासाठी प्रतिलाभार्थी २५० रुपये प्रतिडोज शुल्क आकारण्यात येत आहे. पहिला डोज घेतल्यानंतर लाभार्थ्याने २८ ते ४२ दिवस अंतरात दुसरा डोज घेणे बंधनकारक आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस