सहकारी संस्थांना द्यावा लागणार निवडणूक खर्च
By Admin | Updated: December 13, 2014 22:30 IST2014-12-13T22:30:17+5:302014-12-13T22:30:17+5:30
साखर कारखान्यापासून ते गृहनिर्माण संस्थेपर्यंतच्या सर्व संस्था निवडणुकांचा खर्च उचलावा लागणार आहे. गृहसंस्थेच्या प्रकारानुसार दहा हजार रुपयांपासून १६ लाख रुपयापर्यंतच्या खर्चाची तरतूद करावी लागेल.

सहकारी संस्थांना द्यावा लागणार निवडणूक खर्च
अमरावती : साखर कारखान्यापासून ते गृहनिर्माण संस्थेपर्यंतच्या सर्व संस्था निवडणुकांचा खर्च उचलावा लागणार आहे. गृहसंस्थेच्या प्रकारानुसार दहा हजार रुपयांपासून १६ लाख रुपयापर्यंतच्या खर्चाची तरतूद करावी लागेल. या निधीमधून निवडणूक खर्च तसेच सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे भत्ते चुकविले जाणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाद्वारा अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थासाठी निधी किती घेण्यात यावा, याविषयीचे आदेश काढले आहेत. प्रत्येक संस्थेच्या निवडणुकीसाठी सक्षम राष्ट्रीयीकृत किंवा ‘अ’ वर्ग मिळालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे व या खात्यामधूनच निवडणुकीचा खर्च भागविला जाणार आहे. मतपत्रिका, छपाई, मतपेटी, खरेदी, मतदान केंद्रावर आवश्यक असणारी स्टेशनरी, कर्मचारी, अधिकारी व पोलिसांचे मानधन, कर्मचाऱ्यांचे भोजन हा खर्च या निधीमधून करण्यात येणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्याने विहीद केलेल्या नोंदवहीत जमा-खर्चाच्या नोंदी कराव्यात. निवडणूक खर्चाची रकम शिल्लक राहिल्यास दोन महिन्याच्या आत शिल्लक राहिलेल्या रक्कमेचा धनादेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.