‘गव्हर्न्मेंट मेडिकल’साठी सीएम ‘पॉझिटीव्ह’

By Admin | Updated: July 8, 2017 00:03 IST2017-07-08T00:03:34+5:302017-07-08T00:03:34+5:30

शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

CM 'positive' for 'government medical' | ‘गव्हर्न्मेंट मेडिकल’साठी सीएम ‘पॉझिटीव्ह’

‘गव्हर्न्मेंट मेडिकल’साठी सीएम ‘पॉझिटीव्ह’

पालकमंत्र्यांची माहिती : अमरावतीकरांच्या मागणीची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर ‘लोकमत’सोबत संवाद साधताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ही माहिती दिली.
महसुली मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
अमरावतीच्या तुलनेत लहान अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविदयालय आहे. परंतु अमरावतीत मात्र ही सोय नसल्याने अमरावतीकरांना उपचारासाठी नागपूरला जावे लागते. त्यामुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या समक्ष यासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पालकमंत्री पुढे म्हणाले, अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी जून महिन्याच्या शेवटी सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व सर्व अनुकूल बाबी शहरात उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना यांना दिली. त्यामुळे अमरावतीकरांची ही मागणी लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

Web Title: CM 'positive' for 'government medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.