सीएम चषक स्पर्धेला अल्प उपस्थिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:35 IST2018-12-16T21:34:42+5:302018-12-16T21:35:14+5:30
रविवारी येथील कन्या शाळेच्या प्रांगणात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.

सीएम चषक स्पर्धेला अल्प उपस्थिती!
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : रविवारी येथील कन्या शाळेच्या प्रांगणात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. तथापि, विद्यार्थी व गावातील नागरिकांनी या कार्यक्रमास अल्प उपस्थिती लावली. स्पर्धेदरम्यान भरउन्हात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. अन्य स्पर्धेसाठी सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्यात आला.
एक महिन्यापासून स्पर्धेची नोंदणी करण्यात आली होती. जिल्ह्यातून स्पर्धेकरिता सर्वाधिक नोंदणी झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमस्थळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची अल्प उपस्थिती होती. विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतकेच होते. अल्पवेळ भाषण करून पालकमंत्री निघून गेले. मंडप उभारण्यात न आल्याने स्पर्धकांना उन्हातच रांगोळी काढावी लागली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, तालुकाध्यक्ष विजय मेंढे शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, अतुल गोडे, तुषार बायस्कर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनय गावंडे आदी उपस्थित होते.