चिखलदऱ्यात खोडके गटाचे वर्चस्व; राष्ट्रवादीची नामुष्की
By Admin | Updated: June 30, 2015 00:15 IST2015-06-30T00:15:32+5:302015-06-30T00:15:32+5:30
सोमवारी झालेल्या चिखलदरा नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत खोडके गटाचे राजेंद्रसिंह सोमवंशी यांचा तिसऱ्यांदा विजय झाला.

चिखलदऱ्यात खोडके गटाचे वर्चस्व; राष्ट्रवादीची नामुष्की
'लोकमत'चे वृत्त खरे ठरले : नगराध्यक्ष सोमवंशी, उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन
चिखलदरा : सोमवारी झालेल्या चिखलदरा नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत खोडके गटाचे राजेंद्रसिंह सोमवंशी यांचा तिसऱ्यांदा विजय झाला. उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन शेख मेहबुब दुसऱ्यांदा विजयी झाल्यात.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांना नऊ मते मिळालीत, तर काँग्रेसचे राजेश मांगलकर यांना आठ मते मिळालीत. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेशमा परवीन शे. मेहबुब यांनी राष्ट्रवादीचे अरुण सपकाळ यांचा एका मताने पराभव केला. चिखलदरा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे भाकित ‘लोकमत’ने केले होते. नगराध्यक्षपदी राजेंद्र सोमवंशी व उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन शे. मेहबुब यांची वर्णी लागणार असल्याचे वृत्त आज तंतोतंत खरे ठरले. राज्यात 'क' वर्ग सर्वात लहान नगरपालिका असल्याने व पर्यटन स्थळाच्या या निवडणुकीत राज्यस्तरीय नेत्यांचे लक्ष लागले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता चिखलदरा पालिका भवनात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी एन.आर. सुराडकर तर निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी कामकाज पाहिले.