ढगांचा महिरप तूर उत्पादकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST2020-12-15T04:29:52+5:302020-12-15T04:29:52+5:30

पीक धोक्यात : शेंगा पोखरणाऱ्या अळ्या येवदा : चार-पाच दिवसांपासून येवदा व परिसरात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने तूर ...

Clouds on the roots of turf growers | ढगांचा महिरप तूर उत्पादकांच्या मुळावर

ढगांचा महिरप तूर उत्पादकांच्या मुळावर

पीक धोक्यात : शेंगा पोखरणाऱ्या अळ्या

येवदा : चार-पाच दिवसांपासून येवदा व परिसरात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने तूर आणि चणा तसेच आंबा यांसारख्या पिकांवर अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अजून तीन-चार दिवस असेच राहणार वातावरण असल्याने शेतकºयांनी तातडीने निंबोडी अर्कासोबत बुरशीनाशकाची फवारणी तातडीने करावी. आंब्याला सध्या बहर आला असून, त्या पिकावरसुद्धा बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन येवदा कृषी विभागाचे व्ही.बी. भोई तसेच वडनेर गंगाई येथील सहायक कृषी अधिकारी मनोज कुमावत यांनी केले आहे.

बॉक्स

ढगाळ वातावरणामुळे पिवळ्या फुलांचा सडा

तळवेल : ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दोन ते तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शिवारात तुरीच्या फुलोराचा सडा पडला आहे. ढगाळ वातावरणामुळे फूलगळ व अळ्यांच्या प्रादुर्भाव होत असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगतात. फूलगळीचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

Web Title: Clouds on the roots of turf growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.