शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ढगफुटी; ३३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:46 IST

Amravati : तिवसा तालुक्यात दीडशे हेक्टर शेतजमीन खरडली, १० घरांची पडझड, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने ३३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर महसूल मंडळात १४६ मि.मी., धामणगाव १२० मि.मी., अंजनसिंगी १०९.२५ मि.मी., मंगरूळ दस्तगीर १०४.५ मि.मी., भातकुली ८८.७५ मि.मी., तळेगाव दशासर ६८.७५ मि.मी., चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर, पळसखेड व आमला महसूल मंडळात प्रत्येकी ११७.२५ मि.मी., सातेफळ ११४.७५ मि.मी., घुईखेड ६८.७५ मि.मी., अमरावती तालुक्यातील अमरावती, नवसारी व वडाळी मंडळात प्रत्येकी ८५.५ मि.मी., शिराळा ७३.७५ मि.मी., वलगाव ७३.२५ मि.मी., बडनेरा ६८.२५ मि.मी., माहुली व नांदगाव पेठ ६५ मि.मी., तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळात ७५ मि.मी., कुन्हा ८५ मि.मी., मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर मंडळात ७३.५ मि.मी., अचलपूर तालुक्यातील असदपूर मंडळात ६५ मि.मी., चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा मंडळात ७३.५ मि.मी. भातकुली तालुक्यातील पूर्णानगर मंडळात ७३.७५ मि.मी., आष्टी ७३.२५ मि.मी., भातकुली ७२ मि.मी., आसरा ६८.५ मि.मी., नांदगाव तालुक्यातील दाभा व लोणी मंडळात ६८.२५ मि.मी पावसाची नोंद झाली. 

खोलाड नाल्याच्या पुरात इसमाचा मृत्यू मंगरूळ दस्तगीर : शेतातून परतणारे महादेवराव गाडेकर (६५, रा. पेठ रघुनाथपूर) हे खोलाड नाल्याच्या पुरात वाहत गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पाण्याचा ओढ जास्त असल्याने ते वाहत गेले.

थिलोरी गावात शिरले नाल्याचे पाणीदर्यापूर : तालुक्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांचा पूर शेतात-गावातही शिरला. थिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या नाल्याचे भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरले. दुसरीकडे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. थिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्याजवळील रहिवासीसुद्धा सतर्क झाले आहेत. थिलोरी गावात पाणी नाल्याचे पाणी दरवर्षी शिरते.

नुकसानाचे तत्काळ पंचनामे करा - अडसडधामणगाव रेल्वे : मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ. प्रताप अडसड यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. कृषी सहायक, तलाठी ग्रामसेवक यांची समिती नेमून पंचनामे करावे व जिल्हा प्रशासनाला तात्काळ अहवाल पाठवावा, असे तिन्ही तहसीलदारांना त्यांनी निर्देश दिले. त्याप्रमाणे तिन्ही तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

"दोनही मंडळात उ‌द्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे."- डॉ. मयूर कळसे, तहसीलदार तिवसा.

टॅग्स :Amravatiअमरावती