किसान आंदोलनाची धग आता गावपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST2020-12-30T04:16:57+5:302020-12-30T04:16:57+5:30

(फोटो) अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह ...

The cloud of peasant movement is now at the village level | किसान आंदोलनाची धग आता गावपातळीवर

किसान आंदोलनाची धग आता गावपातळीवर

(फोटो)

अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह अनेक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. याविषयी आता जिल्ह्यातील गावागावांत आंदोलन समितीद्वारे जागृती करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक साहेबराव विधळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

अन्य राज्यांमध्ये केंद्राच्या कृषिकायद्यांविरोधात ठराव घेण्यात आला. तसा ठराव महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेण्याविषयी शासनाला निवेदन देण्यात येत असल्याची माहिती महेंद्र मेटे यांनी दिली. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आता खोडसाड प्रचार करीत असल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला. ३ जानेवारीला नागपूर येथून शेतकऱ्यांचा जत्था आंदोलनासाठी दिल्लीत जाणार आहे. यामध्ये किमान एक हजार शेतकरी सहभागी होतील. यापूर्वी नाशिक येथून एक जत्था दिल्लीला गेला असल्याचे भस्मे यांनी सांगितले.

२५ डिसेंबरला याविषयी बैठक घेण्यात आली. अनेक संघटना सहभागी झाल्यात. यामध्ये आंदोलनाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यत पोहचविण्यासाठी समितीद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचे ठरल्याचे समितीचे समन्वयक बाबा भाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रोशन अर्डक, लक्ष्मण धाकडे, प्रफुल्ल गुडधे, प्रदीप पाटील, सुभाष पांडे, इमरान अशरफी आदी उपस्थित होते.

Web Title: The cloud of peasant movement is now at the village level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.