शासन धोरणाविरुध्द सुवर्णकारांचा कडक डीत बंद
By Admin | Updated: February 11, 2016 00:34 IST2016-02-11T00:34:47+5:302016-02-11T00:34:47+5:30
शासनाने सोने खरेदी करताना ग्राहकांना पॅनकार्ड व आधार कार्ड सक्तीचे केले असून हे धोरण अन्यायकारक असल्याचे मत ...

शासन धोरणाविरुध्द सुवर्णकारांचा कडक डीत बंद
सात कोटींचा फटका : ग्राहकांना पॅनकार्ड, आधारकार्डची सक्ती
अमरावती : शासनाने सोने खरेदी करताना ग्राहकांना पॅनकार्ड व आधार कार्ड सक्तीचे केले असून हे धोरण अन्यायकारक असल्याचे मत नोंदवित सुवर्णकार संघाच्या वतीने बुधवारी सराफा बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला. एक दिवसाच्या बंदमुळे पाच ते सात कोटी रुपयांच्या सोने व्यवसायाला फटका बसल्याचे चित्र आहे.
शासनाने सराफा व्यावसायिकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सोने खरेदी, विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी बरेच बदल केले आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांना आता पॅनकार्ड व आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. हातगाडी, कटला चालक, छोटे व्यावसायिक, सामान्य कुटुंबीयांतील व्यक्तींनादेखील सोने खरेदीच्या वेळेस पॅनकार्ड, आधारकार्डची झेरॉक्स देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करावा की कागदपत्रांची झेरॉक्स सांभाळावी, असे मत सुवर्णाकाराचे आहे. शासनाने सोने खरेदी-विक्री या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रकार सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर सुर्वणकार संघ, सराफा असोसिएशने बंद पुकारुन शासन धोरणचा निषेध केला. शासनाने सोने खरेदी करताना आधार कार्डची सक्ती हे धोरण मागे घ्यावे, अन्यथा सुवर्णकार रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला आहे. बंदमध्ये सराफा असोशिएशन, सुवर्णकार संघ सहभागी झाले होते. राजेंद्र उज्जेनकर, नवरतन गांधी, सिमेश श्रॉफ, अनिल गोगटे, अविनाश चुटके, मोहन जडीया, विजय जडीया, संजय गव्हाणे, समीर कुबडे, प्रदीप वडनेरे आदींनी धोरणाचा निषेध केला.