इतवारा परिसरातील अतिक्रमण साफ

By Admin | Updated: July 14, 2016 23:57 IST2016-07-14T23:57:16+5:302016-07-14T23:57:16+5:30

महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेली अतिक्रमण मोहिम गुरुवारी आठव्या दिवशी धडाक्यात राबविण्यात आली.

Clear encroachment in Auckara area | इतवारा परिसरातील अतिक्रमण साफ

इतवारा परिसरातील अतिक्रमण साफ

संयुक्त मोहीम :लालखडी, वलगावरोड,पठाणपुरा, नागपुरीगेटमध्ये कारवाई
अमरावती : महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेली अतिक्रमण मोहिम गुरुवारी आठव्या दिवशी धडाक्यात राबविण्यात आली. यात इतवारा बाजारस्थित संकुलामधील दुकानदारांनी रस्त्यावर बांधलेल्या ओट्यांवर बुलडोजर फिरविण्यात आला.
चित्रा चौक, प्रभात चौक, इस्माईल कटपिस ते गांधी चौक या मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले. तेथून हा फौजफाटा जयस्तंभ चौकात पोहचला. तेथिल फुटपाथवर, पार्किंगच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईवेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय मालवीय, अतिक्रमण विभागातील पीएसआय विजय चव्हाण, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई उपस्थित होते. कारवाईवेळी संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. याशिवाय दुपारच्या सत्रात नागपुरी गेट ,पठानपुरा,वलगाव रोड,चांदणी चौक लालखडी या भागातील पानटपरी,मासविक्रेते,हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले.भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्यासह पानटपरी जप्त करण्यात आल्या. दुर्गा सॉ मिल परिसरातील अतिक्रमित टिनशेड काढण्यात आले. मागील तीन दिवसांपासून या भागामध्ये अव्याहतपणे अतिक्रमणाची धडक मोहीम राबविली जात आहे.

अतिक्रमणधारकांचा विरोध मावळला !
शहरातील अन्य भागांमध्ये धडाक्यात अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविली गेली. त्याचवेळी इतवारा बाजारासारख्या विशिष्ट भागातील अतिक्रमणधारकांना झुकते माप दिले जात असल्याची ओरड होती.त्या अनुषंगाने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी याच भागाला लक्ष्य करण्यात आले.या भागातील फुटपाथ तर शोधूनही सापडत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी या भागात पक्के अतिक्रमण थाटले आहे. त्या बहुतांश अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने बुलडोजर फिरविला. ही कारवाई होत असताना फारसा विरोध झाला नाही.

Web Title: Clear encroachment in Auckara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.