लोकसहभागातून होणार चुडामणी नदीची स्वच्छता
By Admin | Updated: May 9, 2016 00:12 IST2016-05-09T00:12:28+5:302016-05-09T00:12:28+5:30
नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते.

लोकसहभागातून होणार चुडामणी नदीची स्वच्छता
अमरिश आत्राम यांच्या हस्ते जलपूजन : नागरिकांनी हातभार लावावा
वरुड : नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते. ती पार पाडणे काळाची गरज आहे. रोगरार्ईमुक्त व्हायचे असेल तर वैयक्तिक स्वच्छेतवर भर देणे गरजेचे आहे.
वरुडातील चुडामणी नदीची स्वच्छता लोकसहभागातून केली जात असल्याने ही बाब शहरवासीयांकरिता कौतुकास्पद आहे. ‘नदी स्वच्छ तर गाव स्वच्छ ’ अभियानाला सर्वांनी सहकार्य केल्यास गावाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांनी चुडामणी साफसफाई अभियानादरम्यान जलपूजन कार्यक्रमात केले.
यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, उपाध्यक्ष लीलाधर बेलसरे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाणे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अर्चना मुरुमकर, राजेंद्र राजोरीया, मनोहर आंडे, नितीन खेरडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक प्रमोद पोतदार, व्यापारी संघाचे अध्यक्ष रितेश शहा, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद टाकरखेडे, लोकेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.
खा. रामदास तडस यांनी सांगितले की, लोकसहभागातून प्रमाणिकपणे कोणतेही काम होवू शकते असे सांगितले. याप्रसंगी चुडामणीच्या पूर सरंक्षक भिंतीकरिता खासदार निधीतून २० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)