वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कडंूनी घेतला क्लास
By Admin | Updated: November 4, 2016 00:48 IST2016-11-04T00:48:13+5:302016-11-04T00:48:13+5:30
वीज वितरण कंपनीकडून अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात दोन वर्षांपासून नवीन सबस्टेशनची कामे मंजूर

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कडंूनी घेतला क्लास
आढावा बैठक : नादुरूस्त वीज रोहित्राची कामे करा, अन्यथा कार्यालयात धडक
अमरावती : वीज वितरण कंपनीकडून अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात दोन वर्षांपासून नवीन सबस्टेशनची कामे मंजूर असतानाही ती पूर्ण करण्यात आली नाहीत. याशिवाय कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त आहेत. सोबत नादुरूस्तीची कामे होत नसल्याने बुधवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात क्लास घेण्यात आला. वीज वितरण कंपनीकडील सर्व विजेची कामे येत्या ८ डिसेंबर रोजी पूर्ण करावीत, अन्यथा कार्यालयात शिरून तीव्र आंदोलन करण्याचा दम आ. बच्चू कडू यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भरला आहे.
अचलपूर मतदारसंघात दोन वर्षांपासून आसेगाव, असदपूर, हिवरा पूर्णा, मेघनाथपूर, खरपी, शिरजगाव कसबा, सर्फापूर, हिरूळपूर्णा आदी ठिकाणी नवीन वीज सबस्टेशन मंजूर असतानाही संबंधित कंत्राटदाराने कामेच केली नसल्याचा संताप या बैठकीत आ.कडू यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच आसेगाव पूर्णा व अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. ऐन रबी हंगाम तोंडावर आला असतानाही यावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे आ. कडू यांनी बैठकीत स्पष्ट केले. इंफ्रा टू मधून सबस्टेशनची कामे मंजूर आहेत. मात्र कामाची प्रगती शून्य असल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. एकीकडे वीजपुरवठा कमी दाबाचा होत असताना देयके मात्र दामदुप्पट वसूल केले जातात. बिल नियमित घेता मग १२ तास नियमित वीजपुरवठा का नाही, असा प्रश्नही उपस्थित अधिकाऱ्यांना आमदारांनी केला. त्यामुळे किमान शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता सुरळीत वीज पुरवठा करण्याचा सल्लाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिला. विजेसंबंधित शेतकऱ्यांच्या एक ना अनेक समस्या आहेत. त्यामुळे यासर्व प्रलंबित विजेच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करावी, अशी सूचना आ. कडू यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान प्रलंबित कामे, दुरूती व कमी दाबाच्या वीजपुरवठाबाबतची कारवाही तातडीने करू, अशी ग्वाही अधीक्षक अभियंता भादीकर यांनी बैठकीत दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी के. आर परदेशी, वीज वीतरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर, मोहोड, गिरी, व अन्य अधिकारी, प्रहारचे मंग़ेश देशमुख, तसेच शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)