कक्ष अधिकाऱ्यांचा सीईओंनी घेतला क्लास
By Admin | Updated: September 10, 2014 23:19 IST2014-09-10T23:19:11+5:302014-09-10T23:19:11+5:30
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागातील कक्ष अधिकाऱ्यांचा बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आणि प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद

कक्ष अधिकाऱ्यांचा सीईओंनी घेतला क्लास
अमरावती : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागातील कक्ष अधिकाऱ्यांचा बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आणि प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी क्लास घेतला. यावेळी प्रशासकीय कामातील दफ्तर दिरंगाई दूर करून प्रलंबित कामे तातडीने निकाली काढावे, असे निर्देश कक्ष अधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य, महिला व बालकल्याण, बांधकाम, समाजकल्याण, पाणी पुरवठा, सिंचन, सामान्य प्रशासन, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, या विभागासह जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमधील सर्व कक्ष अधिकारी आदींकडून मुख्यकार्यकारी अधिकारी भंडारी यांनी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणांची अद्ययाव तस्थिती, सेवानिवृत्ती प्रकरणे ( शिक्षक संवर्गासह) खाते चौकशी प्रकरणे बिंदू नामावली अद्ययावत करणे, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यलयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रांचा आढावा, आमदार आणि खासदार यांचे कडून प्राप्त झालेल्या पत्रांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा व जिल्हा परिषद सदस्यांकडून प्राप्त झालेल्या पत्रांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कक्ष अधिकाऱ्यांकडून वरील विषयावर मुद्देनिहाय मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चर्चा करून काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. या बैठकीला १४ पंचायत समितीमधील सर्व सहायक, प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेल्या सूचनांचा काटेकोर पालन करण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी दिले.