‘व्हॅलेंटाईन डे’वर शहर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:47+5:302021-02-14T04:13:47+5:30

अमरावती: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा शहरात कडक पोलीस बंदोबस्त ...

City police on Valentine's Day | ‘व्हॅलेंटाईन डे’वर शहर पोलिसांची नजर

‘व्हॅलेंटाईन डे’वर शहर पोलिसांची नजर

अमरावती: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा शहरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार असून, होऊ घातलेल्या व्हॅलेंटाईन डेवर पोलिसांची नजर राहणार आहे.

पोलीस आयुक्तलय कार्यक्षेत्रातील छत्री तलाव, वडाळी तलाव, बांबू गार्डन, विविध बगीचे, पार्क, गर्दीची ठिकाणे, गिफ्ट विक्रीची दुकाने आदी ठिकाणी सर्व ठाण्याचा विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच दामिनी पथके, सीआर मोबाईल व्हॅन, बीट मार्शल, डीबी स्कॉड, गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात आले आहे. वाहतूक विभागाकडून भरधाव वेगाने वाहन चालविणारे किंवा वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाईंची निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले आहे. तरुणांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडल्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याकरीत संबधित ठाणेदारांना पोलीस आयुक्तांनी निर्देश दिले.

Web Title: City police on Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.