शहर पोलिसांचे धाडसत्र, १० दारू विक्रेत्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST2021-05-07T04:14:00+5:302021-05-07T04:14:00+5:30

भातकुली, खोलापुरी गेट, राजापेठ, वलगाव, नांदगाव पेठ, गाडगेनगर व बडनेरा पोलिसांनी ही कारवाई केली. बडनेरा पोलिसांनी अकोला नाका स्थित ...

City police arrest 10 liquor dealers | शहर पोलिसांचे धाडसत्र, १० दारू विक्रेत्यांना अटक

शहर पोलिसांचे धाडसत्र, १० दारू विक्रेत्यांना अटक

भातकुली, खोलापुरी गेट, राजापेठ, वलगाव, नांदगाव पेठ, गाडगेनगर व बडनेरा पोलिसांनी ही कारवाई केली. बडनेरा पोलिसांनी अकोला नाका स्थित रेशीम पार्क परिसरात प्रदीप देवानंद अडकने याला ताब्यात घेऊन १ हजार रुपयांची गावठी दारु जप्त केली. गाडगेनगर पोलिसांनी भिमनगरातून रवि उईके याच्या ताब्यातील ९०० रुपयांची दारु जप्त केली. पोलिसांना पाहून तो घटनास्थळावरून पसार झाला. तसेच विलासनगरात अमोल सिध्दार्थ मकेश्वर (२८रा. खोलापुरी गेट) याला ताब्यात घेऊन ३ हजार रुपयांची अवैध देशी दारु जप्त केली. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगरात अक्षय श्याम पाल (२० रा. शोभानगर) याला ताब्यात घेऊन १ हजार ७९० रुपयांची अवैध दारु जप्त केली. नांदगाव पेठ पोलिसांनी वडगाव माहुरेत सुनिल श्रीराम सोनवनेला ताब्यात ६६० रुपयांची दारु जप्त केली. वलगाव पोलिसांनी अवधूत महाराज मंदिराजवळ गुणवंत रमेश विजयकर (३२ रा. वलगाव) याला ताब्यात घेऊन ६२४ रुपयांची दारु जप्त केली. राजापेठ पोलिसांनी ड्रीमलॅन्ड बारमागील परिसरातून गौरव पंचु यादव (२०) याच्या ताब्यातून ७१५ रुपयांची दारु जप्त केली. खोलापुरी गेट पोलिसांनी सागरनगरात धाड टाकून महेंद्र शंकर पंडीत (४०) याच्याकडून पाचशे रुपयांची गावठी दारु जप्त केली. खडकाडीपुर्यातून महेंद्र शंकर पंडीतकडून ७२० रुपयांची दारु जप्त केली. भातकुली पोलिसांनी सायत गावातून राहुल यशवंत वर्धे याच्याकडून १ हजार २६० रुपयांची दारु जप्त केली.

Web Title: City police arrest 10 liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.