शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

‘नंबर गेम’मधून शहर बाद; केवळ रँकिंगची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:20 AM

बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

ठळक मुद्देशहरनिहाय गुणांकनाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता केवळ स्वच्छता रँकिंगची प्रतिक्षा लागून राहिली आहे.जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ घेण्यात आले होते. ४ हजार गुणांच्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. त्यातील विविध राष्ट्रीय तथा राज्यपातळीवरील ‘स्वच्छ’ पुरस्कारात अमरावतीचा टिकाव लागलेला नाही. त्यामुळे स्पर्धेत असलेली एकूण ४०४१ शहरे व त्यातील ५०० अमृत शहरांच्या तुलनेत अमरावती शहराचे स्वच्छता रॅकिंग नेमके किती? याबाबत जाणून घेण्याची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. पुरस्कारप्राप्त शहरांच्या यादीत कुठल्याही ‘कॅटेगरी’त नाव नसल्याने गतवर्षीच्या २३३ व्या क्रमांकावरुन शहर पुढे सरकते की पहिल्या शंभर क्रमांकात येते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शहराचे मानांकन जाणून घेण्याची उत्सूकता लागलेल्या महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी नगरविकास विभागासह स्वच्छ भारत मिशनशी संपर्क साधून अमरावतीच्या निकालाबाबत विचारणा केली. मात्र बुधवारी निवडक पुरस्कार घोषित करण्यात आले असून संपुर्ण देशातील ४०४१ शहरांचे स्वच्छता रॅकिंग पारितोषिक वितरणावेळी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात शहर कोणत्या क्रमांकावर ही उत्सुकता गुरुवारपर्यंत शमू शकली नव्हती. केंद्रिय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. इंदूर हे सलग दुसºया वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचे ‘स्वच्छ’ शहर ठरले. तर भोपाळ व चंदीगढ या शहरांनी अनक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई शहर घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्तम ठरले आहे. परभणी शहर नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती