शिवरायांच्या जल्लोषाने दुमदुमले शहर
By Admin | Updated: March 27, 2016 00:00 IST2016-03-27T00:00:09+5:302016-03-27T00:00:09+5:30
शिवजयंतीनिमित्त शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सामाजिक संघटनांनी शनिवारी सायंकाळी शहरात विविध ठिकाणी भव्य रॅली काढली.

शिवरायांच्या जल्लोषाने दुमदुमले शहर
जल्लोष : शिवसेना, मनसे, सामाजिक संघटनांची रॅली
अमरावती : शिवजयंतीनिमित्त शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सामाजिक संघटनांनी शनिवारी सायंकाळी शहरात विविध ठिकाणी भव्य रॅली काढली. आकर्षक रोशणाई, ढोल-ताशे, शिवरायांच्या प्रतिकृती यासह शिवचरित्रातील प्रतिमा असणारे रथ हे शोभायात्रेचे आकर्षण होते. चौका-चौकांत या शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी' या जयघोषाने शहर दुमदुमले.
शिवसेनेव्दारा गांधी चौकात अर्धाकृती शिवरायांच्या पुतळ्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. शिवाजी महाराज, संभाजी राजे आदींच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. रॅली राजकमल चौक, जवाहर गेट मार्गे भाजी बाजार या परिसरातून काढण्यात आली.