शहर काँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST2021-06-27T04:10:01+5:302021-06-27T04:10:01+5:30
आंदोलन, भाजपमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप अमरावती : राजर्षी शाहू महाराजांची जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ...

शहर काँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध
आंदोलन, भाजपमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप
अमरावती : राजर्षी शाहू महाराजांची जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचा शनिवारी आ. सुलभा खोडके, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु, त्यांनी ती सादर केली नाही. त्यामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविले गेले. राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकार त्याला जबाबदार असल्याचा आराेप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रसंगी नगरसेवक प्रदीप हिवसे, प्रशांत डवरे, प्रशांत महल्ले, शोभा शिंदे, अनिल माधोगडिया, सादिक शाह, संजय वाघ, राजीव भेले, जिया खान, अभिनंदन पेंढारी, बिलाल खान, सुरेश रतावा, भैयासाहेब निचळ, गजानन राजगुरे, राजेंद्र भंसाली, मुकेश छांगाणी, देवयानी कुर्वे, राजा बांगडे, नीलेश गुहे, संकेत कुलट, गुड्डू हमीद, सागर देशमुख, जयश्री वानखडे, अस्मा परवीन, जितेंद्र वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.